सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : पुण्यात विषारी दारूमुळे 13 जणांचे बळी, देवेंद्र फडणवीसांचे कडक कारवाईचे निर्देश
  • मोठी बातमी : IMD च्या दुसऱ्या अंदाजाने धाकधूक वाढली, महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस, उष्णतेची लाट अधिक
 क्राईम

पुणे–पिंपरीत विषारी दारू प्रकरण: १३ जणांचा मृत्यू, मिथेनॉल मिश्रणाचा संशय; मुख्य आरोपीसह ८ जण अटकेत

डिजिटल पुणे    29-05-2026 12:18:11

पुणे/पिंपरी चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून अनेक भागांत तपास व छापे टाकले जात आहेत.

पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील हडपसर आणि काळेपडळ भागातही ५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मृतांमध्ये दारू सेवन केल्यानंतर तोंडाला फेस येणे आणि अचानक तब्येत बिघडणे अशी लक्षणे दिसल्याचे सांगितले जात आहे.

प्राथमिक तपासानुसार, ही दारू योगेश वानखेडे याच्याकडून वितरित करण्यात आल्याचा संशय आहे. दारूमध्ये मिथेनॉलसारखे विषारी रसायन मिसळल्यामुळे ही गंभीर घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात आणखी एक आरोपी कर्नलसिंह विरखा याचे नावही समोर आले असून तो संबंधित दारू गुत्ता चालवत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. दोघांसह त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई करत पोलिसांनी आतापर्यंत ८ जणांना अटक केली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांना समन्वयाने तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून उत्पादन शुल्क विभागही तपासात सहभागी झाला आहे. संबंधित ठिकाणी छापे टाकण्याची कारवाई सुरू आहे.

पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडी परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती