सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू! उद्या तारीख,वेळ आणि ठिकाण जाहीर करणार
  • यूपी, बिहारमध्ये वादळ आणि पावसामुळे 48 जणांचा मृत्यू; इनोव्हा ट्रॅक्टरसह 10 वाहने वाहून गेली; बिहारमध्ये 4 विमानांचे मार्ग बदलले, 18 विमानांना विलंब; पंजाबमध्ये गारपिट वादळ
  • धडाकेबाज तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, पिंपरीतील विषारी दारुकांडाचे भिवंडी कनेक्शन उघड, मोठा साठा जप्त
  • ‘देऊळ बंद 2’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड; 9 दिवसांत 39 कोटींचा टप्पा पार, अनेक सुपरहिट चित्रपटांना टाकलं मागे
 शहर

विषारी दारूकांडानंतर मोठी कारवाई; हडपसर पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी निलंबित

डिजिटल पुणे    30-05-2026 14:19:19

पुणे : हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणानंतर पुणे शहर पोलिस दलाने कठोर पाऊल उचलत तीन पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. कर्तव्यातील हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणाबाबत ठपका ठेवत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे आदेश जारी केले आहेत.

निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, हडपसर चौकीच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार आणि गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांचा समावेश आहे.

हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विषारी अथवा गावठी दारूच्या सेवनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली होती. या प्रकरणात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद असून, संबंधितांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्राथमिक चौकशीत अवैध दारू विक्रीबाबत माहिती उपलब्ध असतानाही आवश्यक प्रतिबंधात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात संबंधित अधिकारी अपयशी ठरल्याचे निदर्शनास आले. या दुर्लक्षामुळे पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का पोहोचल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, विषारी दारूकांड प्रकरणाचा तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती