उरण : उलवे सेक्टर १९ येथील चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा, तसेच बस तिकीटांवर व दैनंदिन व्यवहारात वापरले जाणारे 'शगुन चौक' हे नाव बदलून 'छत्रपती शिवाजी महाराज चौक' करण्यात यावे, या मागणीसाठी उलवे नियोजन समिती तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श्री अजितदादा पवार गट )यांच्या वतीने काही महिन्या पूर्वी आंदोलन करण्यात आले होते . या आंदोलनाला व त्यांनी केलेल्या पत्रव्यवहाराला, पाठपुराव्याला आता यश आले असून शगून चौक हे नाव बदलण्यात आले असून त्या ऐवजी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातर्फे (NMMT) उलवे, सेक्टर १९ येथील बस स्थानकाच्या नावामध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श्रीअजितदादा पवार गट)उलवे तसेच उलवे नियोजन समिती यांच्या आंदोलनाला पाठपुराव्याला यश आले असून, आता बस तिकिटांवर तसेच NMMT च्या प्रणालीमध्ये 'श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक' असे नवीन नाव छापून येण्यास सुरुवात झाली आहे.
उलवे शहरातील नागरिक आणि शिवप्रेमी गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सेक्टर १९ येथील चौकात उभारावा, अशी मागणी सातत्याने करीत आहेत.तसेच 'शगुन चौक' या नावाऐवजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, असे नामकरण करावे, यासाठी सिडको प्रशासन व परिवहन विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता.मात्र या मागण्यांकडे अनेकदा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले होते आता मात्र मागणी पूर्ण झाल्याने सर्वच शिवप्रेमी,उलवे नियोजन समिती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला आहे.या प्रसंगी बोलताना उलवे नियोजन समितीचे अध्यक्ष संतोष काटे यांनी सांगितले की हा सर्वांचा विजय आहे. सर्वांनी यासाठी पाठपुरावा केला होता.आता जनतेची, शिवप्रेमीची मागणी पूर्ण झाली आहे. मागणी पूर्ण झाल्याने संतोष काटे यांनी नवी मुंबई महानगर पालिकेचे व परिवहन विभागाचे आभार मानले आहेत.