सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू! उद्या तारीख,वेळ आणि ठिकाण जाहीर करणार
  • यूपी, बिहारमध्ये वादळ आणि पावसामुळे 48 जणांचा मृत्यू; इनोव्हा ट्रॅक्टरसह 10 वाहने वाहून गेली; बिहारमध्ये 4 विमानांचे मार्ग बदलले, 18 विमानांना विलंब; पंजाबमध्ये गारपिट वादळ
  • धडाकेबाज तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, पिंपरीतील विषारी दारुकांडाचे भिवंडी कनेक्शन उघड, मोठा साठा जप्त
  • ‘देऊळ बंद 2’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड; 9 दिवसांत 39 कोटींचा टप्पा पार, अनेक सुपरहिट चित्रपटांना टाकलं मागे
 जिल्हा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीराम अर्बन को-ऑप. बँक लिमिटेडच्या चिंचभवन शाखेचे उद्घाटन

डिजिटल पुणे    30-05-2026 16:53:36

नागपूर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज श्रीराम अर्बन को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या चिंचभवन शाखेचे उद्घाटन करण्यात आले.चिंचभवन येथील काचोरे पाटील नगरात या बँकेच्या 6 व्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, माजी आमदार संदीप जोशी, महापौर नीता ठाकरे, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, श्रीराम अर्बन को- ऑप. बँक लि.चे अध्यक्ष पराग सराफ, उपाध्यक्ष अजित गोकर्ण आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी बँकेचे अध्यक्ष पराग सराफ यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना बँकेच्या प्रगती विषयी माहिती दिली तसेच संचालक मंडळाचा परिचय करून दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकेच्या नवीन शाखेला आणि संपूर्ण संचालक मंडळ व अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


 Give Feedback



 जाहिराती