सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : भावगीतांची सम्राज्ञी हरपली! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा
 शहर

राज्यातील ज्योतिर्विदांचे पुण्यात विचारमंथन ;'साधना–सिद्धी गौरव महोत्सव २०२६' येत्या ७ जून रोजी

डिजिटल पुणे    01-06-2026 14:10:02

पुणे : ज्योती जोशी ज्योतिष इन्स्टिट्यूट आणि अभिजीत प्रतिष्ठान (मुंबई) तर्फे पुण्यात दि.७ जून २०२६ रोजी ज्योतिष क्षेत्रातील मान्यवरांचा 'साधना–सिद्धी गौरव महोत्सव २०२६' आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ज्योतिष क्षेत्रातील विद्यार्थी,अभ्यासक आणि गुरुजन एकाच व्यासपीठावर येणार आहेत.पुण्यातील प्रभात रस्ता  येथील हॉटेल प्रेसिडेंट येथे सकाळी ८.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पार पडणार आहे.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आचार्य महामंडलेश्वर महंत सुधीरदास पुजारी उपस्थित राहणार आहेत.उद्घाटक म्हणून एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश कराड,स्वागताध्यक्ष म्हणून पुंडलिक दाते हे उपस्थित राहणार आहेत.अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.गोविंद कुलकर्णी,ज्योतिषरत्न वेदमूर्ती गोरक्षनाथ पैठणकर गुरुजी,सौ.गौरी केंजळे,प्रिया मालवणकर,सुनील पुरोहित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 या महोत्सवामध्ये ज्योतिषशास्त्रातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम,ज्येष्ठ ज्योतिषाचार्यांचा गौरव,मार्गदर्शनपर सत्रे,पुस्तक प्रकाशन,गुरुंचे आशीर्वचन आणि नव्या पिढीला ज्योतिष क्षेत्राकडे प्रेरित करणारे विविध उपक्रम होणार आहेत.पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक दृष्टिकोन यांचा संगम घडवून आणण्याचा प्रयत्न या महोत्सवातून केला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.'यशस्वी ज्योतिषी घडण्यासाठी कोणत्या शाखा अनिवार्य?,पुनर्विवाह योग कसे पाहावे,जेमिनी महादशेचे गूढ विश्लेषण,टॅरो कार्ड आणि पुनर्जन्म अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन सत्रे होणार आहेत.अभिजीत प्रतिष्ठान हे महोत्सव प्रायोजक आहेत. 


 Give Feedback



 जाहिराती