सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके 6 जूनला भारतात; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आंदोलनाची घोषणा
  • "मोदींनी विकासाचा मुद्दा पटवून दिला तर भाजपमध्ये जाईन; संजय राऊतांचा टोला"
  • आनंदाची बातमी! केरळमध्ये मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात दमदार पावसासाठी अजून प्रतीक्षा
  • : भावगीतांची सम्राज्ञी हरपली! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा
 शहर

पर्यावरण दिनानिमित्त काव्य आणि गीतांची गुंफण ;'सृष्टीचे सृजन गान' सांगीतिक कार्यक्रम ५ जून रोजी ;

डिजिटल पुणे    01-06-2026 15:31:29

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काव्य आणि गीतांची सुरेल गुंफण असलेला 'सृष्टीचे सृजन गान' हा  सांगीतिक कार्यक्रम शुक्रवार, दि.५ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. भारतीय विद्या भवनचे  सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,सेनापती बापट रस्ता येथे  हा कार्यक्रम होणार आहे.'शिवमंगल स्वर नाट्यधारा' निर्मित या कार्यक्रमाची संकल्पना अंजली कऱ्हाडकर यांची आहे.

या कार्यक्रमात अस्मिता परांजपे, सीमा परांजपे, अवनी परांजपे, आर्या परांजपे, शिवानी सरपोतदार आणि अंजली कऱ्हाडकर   हे कलाकार सहभागी होणार आहेत. तसेच सुदिन  जोशी (संवादिनी), ओंकार जोशी (तबला) आणि अमृता ठाकूरदेसाई (सिंथेसायझर) हे कलाकार साथसंगत करणार आहेत.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणारा हा २९३ वा कार्यक्रम आहे,प्रवेश विनामूल्य आहे,अशी माहिती भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी  दिली. पर्यावरण, निसर्ग आणि मानवी जीवन यांचा परस्परसंबंध उलगडणाऱ्या कविता, गीते आणि संगीताची अनोखी मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.पर्यावरण संवर्धनाचा संदेश कला, काव्य आणि संगीताच्या माध्यमातून प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला जाणार आहे. 


 Give Feedback



 जाहिराती