सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार; देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर
  • मान्सूनपूर्व पावसाचा कहर! राज्यभर शेतीचे मोठे नुकसान; भिंत कोसळून मुलीचा मृत्यू, फळबागा उद्ध्वस्त
  • तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
  • देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही; विधान परिषदेवरून रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, 'माझे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत चांगले संबंध...'
 क्राईम

स्वारगेट अत्याचार प्रकरण : आरोपी दत्तात्रय गाडेविरुद्ध दोषारोप निश्चित; ८७ साक्षीदारांच्या आधारे खटल्याला वेग

डिजिटल पुणे    02-06-2026 15:26:27

पुणे : स्वारगेट एसटी बसस्थानकातील अत्याचार प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली असून आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याच्याविरुद्ध न्यायालयाने दोषारोप निश्चित केले आहेत. विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयात ८७ साक्षीदारांची आणि विविध पुराव्यांची यादी सादर केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जून रोजी होणार आहे.

२५ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र पुणे पोलिसांनी त्याचा शोध घेऊन शिरूर तालुक्यातील गुनाट परिसरातून अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला सुरुवातीला पोलिस कोठडी सुनावली होती.

या प्रकरणाचा तपास पूर्ण करत पोलिसांनी अवघ्या ५२ दिवसांत तब्बल ८९२ पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. तपासादरम्यान अनेक तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यात आले. त्यामध्ये गुगल सर्च हिस्टरी, सीसीटीव्ही फुटेज, ओळख परेड, ध्वनी तीव्रता पडताळणी आणि संबंधित व्यक्तींची निवेदने यांचा समावेश आहे.

पोलिसांनी एकूण १२ पंचनामे केले असून, या पुराव्यांच्या आधारे आरोपी गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असल्याचे स्पष्ट होत असल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. आता दोषारोप निश्चित झाल्याने या बहुचर्चित प्रकरणाच्या सुनावणीला अधिक गती मिळणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती