सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार; देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर
  • मान्सूनपूर्व पावसाचा कहर! राज्यभर शेतीचे मोठे नुकसान; भिंत कोसळून मुलीचा मृत्यू, फळबागा उद्ध्वस्त
  • तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
  • देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही; विधान परिषदेवरून रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, 'माझे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत चांगले संबंध...'
 शहर

कात्रज येथे ‘लाल परी’चा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

डिजिटल पुणे    02-06-2026 16:33:42

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची जनमानसातील जिव्हाळ्याची ओळख असलेल्या ‘लाल परी’चा ७८ वा वर्धापन दिन कात्रज येथील मोरे बाग बस थांब्यावर उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

एस.टी. महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री. भागुजी भीमा उर्फ अण्णा बराटे व सेवानिवृत्त वाहक श्री. सुनिल चव्हाण हे गेल्या नऊ वर्षांपासून गुड मॉर्निंग ग्रुप, कात्रज यांच्या सहकार्याने हा उपक्रम सातत्याने राबवत आहेत. यंदाही सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी अण्णा बराटे यांच्या कुटुंबीयांसह श्री. सुनिल चव्हाण आणि गुड मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

यावेळी एस.टी. महामंडळातील चालक व वाहक यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ‘लाल परी’चे पूजन करून श्रीफळ अर्पण करण्यात आले. राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारी सेवा देणाऱ्या एस.टी. महामंडळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून हा उपक्रम दरवर्षी साजरा केला जातो.

कार्यक्रमास भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय गुड मॉर्निंग ग्रुप, कात्रजचे ४० हून अधिक सदस्य, एस.टी. कर्मचारी, चालक-वाहक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या कार्याचा गौरव केला आणि ‘लाल परी’च्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.


 Give Feedback



 जाहिराती