सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सुरतजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; बसला आग लागून 7 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
  • : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार; देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर
  • मान्सूनपूर्व पावसाचा कहर! राज्यभर शेतीचे मोठे नुकसान; भिंत कोसळून मुलीचा मृत्यू, फळबागा उद्ध्वस्त
  • तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
  • देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही; विधान परिषदेवरून रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, 'माझे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत चांगले संबंध...'
 शहर

एएसीएसबी कडून भारती विद्यापीठ आयएमईडीला सदस्यत्व ; ४ जून रोजी प्रदान समारंभ व विशेष परिसंवाद

डिजिटल पुणे    02-06-2026 17:43:58

पुणे :भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट  (आयएमईडी), पुणे यांना असोसिएशन टू अॅडव्हान्स कॉलेजिएट स्कूल्स ऑफ बिझनेस (एएसीएसबी ) या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित संस्थेचे संस्थात्मक सदस्यत्व जाहीर  झाले आहे. व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात एएसीएसबीचे मानांकन आणि सदस्यत्व हे जागतिक स्तरावर अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. या सदस्यत्व प्रदान समारंभासह “व्यवस्थापन शिक्षणातील जागतिक मानदंड : एएसीएसबी परिसंस्थेची ओळख” या विषयावरील विशेष सत्राचे आयोजन गुरुवार, दि. ४ जून २०२६ रोजी करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम सकाळी १०.३० ते दुपारी ३.०० या वेळेत भारती विद्यापीठाच्या एरंडवणे, पौड रस्ता येथील कॅम्पस मधील स्व.अभिजितदादा कदम सभागृहात होणार आहे.या कार्यक्रमाला भारती विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच विद्यापीठाचे कार्यवाह  व प्र-कुलगुरू डॉ. विश्वजित कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी आणि बीव्ही हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. आयएमईडीचे संचालक डॉ. श्रवण कडवेकर , उपसंचालक डॉ. रामचंद्र महाडिक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

या कार्यक्रमात एएसीएसबी इंटरनॅशनलचे दक्षिण आशिया विभागप्रमुख प्रताप दास हे एएसीएसबी परिसंस्था, व्यवस्थापन शिक्षणातील आंतरराष्ट्रीय दर्जात्मक निकष, मानांकन प्रक्रिया तसेच शैक्षणिक गुणवत्ता आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या सर्वोत्तम पद्धतींबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

व्यवस्थापन शिक्षणातील जागतिक स्तरावरील मानके, एएसीएसबी सदस्यत्वाचे लाभ आणि त्यातून उपलब्ध होणाऱ्या विविध संधी यांची माहिती शैक्षणिक नेते, प्राध्यापक, संशोधक, प्रशासकीय अधिकारी आणि विद्यार्थ्यांना करून देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रातील उदयोन्मुख प्रवाह समजून घेण्यासाठी तसेच जागतिक दर्जाच्या उत्कृष्टतेप्रती संस्थात्मक बांधिलकी अधिक दृढ करण्यासाठी हा कार्यक्रम एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


 Give Feedback



 जाहिराती