सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सुरतजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; बसला आग लागून 7 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
  • : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार; देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर
  • मान्सूनपूर्व पावसाचा कहर! राज्यभर शेतीचे मोठे नुकसान; भिंत कोसळून मुलीचा मृत्यू, फळबागा उद्ध्वस्त
  • तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
  • देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही; विधान परिषदेवरून रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, 'माझे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत चांगले संबंध...'
 शहर

बंगळुरू महामार्गावर तीन अतिरिक्त भुयारी मार्गांना मंजुरी; भूमकर चौक, ताथवडे आणि पुनावळेचा समावेश

डिजिटल पुणे    03-06-2026 11:00:28

पिंपरी-चिंचवड : पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी भूमकर चौक, ताथवडे आणि पुनावळे येथे तीन अतिरिक्त भुयारी मार्ग (अंडरपास) उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ७५ ते ८० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) याबाबत निर्णय घेतला आहे.

सध्या या भागांमध्ये असलेले अरुंद आणि कमी उंचीचे भुयारी मार्ग वाढत्या वाहतुकीसाठी अपुरे ठरत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना दररोज मोठ्या प्रमाणात कोंडीचा सामना करावा लागत आहे. याबाबत सातत्याने वृत्तांकन झाल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

ताथवडे आणि पुनावळे येथील कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून पुढील काही महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या नव्या भुयारी मार्गांमुळे पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असून परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तांत्रिक विभाग व्यवस्थापक अंकित यादव यांनी सांगितले की, पुणे महापालिका हद्दीत एक आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत दोन अशा तीन अतिरिक्त भुयारी मार्गांना मंजुरी मिळाली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान प्रत्यक्ष काम सुरू होण्याची अपेक्षा आहे.


 News Feedback

Digital Pune
subhash yeware
 03-06-2026 13:07:51

बालेवाडी व वाकड च्या मध्ये पण अशा भुयारी मार्गांना मंजुरी द्यायला हवी होती. मिटकाॅन जवळ तसेच उत्तरे कडे पण एखादं ठिकाणी अशा भुयारी मार्गांची नितांत आवश्यकता आहे.एरिया वंचित राहिल्याचा खेद राहील. धन्यवाद

 Give Feedback



 जाहिराती