सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सुरतजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; बसला आग लागून 7 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
  • : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार; देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर
  • मान्सूनपूर्व पावसाचा कहर! राज्यभर शेतीचे मोठे नुकसान; भिंत कोसळून मुलीचा मृत्यू, फळबागा उद्ध्वस्त
  • तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
  • देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही; विधान परिषदेवरून रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, 'माझे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत चांगले संबंध...'
 जिल्हा

मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या पर्यावरणपूरक वस्तू भेट देऊन दिल्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ सदस्यांना शुभेच्छा

डिजिटल पुणे    03-06-2026 11:11:58

मुंबई : जागतिक पर्यावरण दिन, ५ जून च्या पार्श्वभूमीवर पर्यावरण व वातारवणीय विभागाच्या वतीने रोजच्या वापरातील पर्यावरणपूरक वस्तूंचे किट तयार करण्यात आले आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी हे किट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांना भेट देऊन जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर वाढविण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत पर्यावरणपूरक डायरी, पाण्याची बॉटल, किचेन, चिनी मातीचे कप, व्हिजिटिंग कार्ड होल्डर, पेपर होल्डर आदींचा समावेश असलेल्या वस्तूंचे किट तयार केले आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे स्वागत करून जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


 Give Feedback



 जाहिराती