सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • केरळमध्ये मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात पुढील 48 तासांत पावसाची शक्यता, विदर्भाला 15 जूनपर्यंत प्रतीक्षा
 शहर

अमेरिकेतील नृत्यगुरू रम्या रामनारायण यांचे ‘अनुगमनम्’; ७ जून रोजी पुण्यात आयोजन

डिजिटल पुणे    03-06-2026 14:18:00

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत रविवार,दि.७ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता 'अनुगमनम्' हा  नृत्याविष्कार रसिकांसाठी सादर करण्यात येणार आहे.

तेजदीप्ती डान्स स्कूल प्रस्तुत 'संप्रदाय टू संवाद' या मालिकेतील हा कार्यक्रम असून अमेरिकेतील नृत्यगुरू रम्या रामनारायण यांच्या मार्गदर्शनाखाली सादर होणारा हा समूह नृत्याविष्कार भारतीय शास्त्रीय नृत्यपरंपरेचा समृद्ध वारसा आणि आधुनिक अभिव्यक्ती यांचा सुंदर संगम प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.भरतनाट्यम मधील वळवूर बाणीमधील ही संरचना रम्या रामनारायण आणि सहकलाकार सादर करणार आहेत.

कार्यक्रम भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता,पुणे येथे होणार आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित हा २९५ वा कार्यक्रम असून सर्वांना प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.


 Give Feedback



 जाहिराती