सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : ममता बॅनर्जींना धक्क्यावर धक्के, एकाच दिवशी 80 पैकी 60 आमदार फुटले, पुतण्या अभिषेक बॅनर्जींच्या घरी ED ची धाड
  • शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी, 25 हजारांपर्यंतच पगार असावा; शेतकरी संघटना अन् विरोधकांचा संताप
  • पुणे दारू कांडानंतर उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये! ठाण्याच्या खाड्यांमध्ये 1 कोटींची गावठी दारू नष्ट, पोकलेनने हातभट्ट्या उद्ध्वस्त
  • हिंजवडीतील ‘थिंकटेक’ फसवणूक प्रकरणात मालक अटकेत; 700 आयटी कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक उघड
 जिल्हा

म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांची गेट वे ऑफ इंडियाला भेट

डिजिटल पुणे    03-06-2026 18:12:01

मुंबई: भारत दौऱ्यावर आलेल्या म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांनी आज मुंबईतील ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडियाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत म्यानमारचे शिष्टमंडळ, तसेच ताज हॉटेलचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित उपस्थित होते.राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांनी गेट वे ऑफ इंडियाची वास्तूरचना, ऐतिहासिक महत्त्व आणि त्यामागील वारसा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. भेटी दरम्यान राष्ट्रपतींनी या भव्य स्मारकाची बारकाईने पाहणी केली. गेट वे ऑफ इंडियाची वैशिष्ट्ये, बांधकामातील कलात्मकता; तसेच भारताच्या इतिहासातील स्थान याविषयी त्यांनी विशेष उत्सुकता दाखवली.गेट वे ऑफ इंडियाचा इतिहास आणि वास्तुशिल्पीय वैशिष्ट्ये जाणून घेताना ह्लाईंग यांनी गेट वे ऑफ इंडियाचे कौतुक केले. त्यांनी यावेळी विविध पैलूंची माहिती उत्सुकतेने समजून घेतली.


 Give Feedback



 जाहिराती