उरण : दिनांक ३/६/२०२६ रोजी आमदार रोहित दादा पवार यांनी उरण तालुक्यातील करंजा गावाला भेट देऊन करंजा येथील प्रसिद्ध असलेल्या द्रोणागिरी मातेच्या मंदीराला भेट देऊन दर्शन घेतले. आणि द्रोणागिरी मंदाराला मिळालेला पर्यटनाचा दर्जा बाबत तसेच मंदीर परीसर शुशोभिकरणा बाबत ग्रामस्थांकडून सविस्तर माहीती घेतली. मच्छीमार समाजाचे तसेच शेतकरी वर्गाचे प्रश्न समजुन घेतले. मच्छीमार समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्सा बाबत करंजा मच्छीमार सोसायटी च्या कार्यालयाला भेट देऊन डिझेल कोटा, डिझेल परतावा, करंजा बंदरात मच्छीमारांना भेडसवणाऱ्या विविध समस्या ,मच्छीमारांच्या गावठान विस्ताराचा प्रश्न, मच्छीमारांची व्यापारी वर्गा कडून होणारी फसवणूक, शासना कडून नव्यानेचं मिळालेला शेतकरी दर्जा परंतु आत्ता पर्यंत मच्छीमार समाजाला याचा कोणत्याही प्रकारचा लाभ मिळालेला नाही या बाबत तसेच विवीध समस्स्यां बाबत सविस्तर माहीती घेतली. नव्यानेच सुरू असलेल्या करंजा रेवस पुलाची बोटीतुन पहाणी केली या पुलाच्या कामामुळे बाधीत मच्छीमार आणी शेतकरी वर्गाला मिळणाऱ्या नुकसान भरपाई बाबतीत तसेच या पुलाच्या कामामुळे होणाऱ्या अन्याया बाबतीत ग्रामस्थांसोबत चर्चा केली.
या सर्व समस्या बाबत आणि करंजा पोर्ट बाबत येणाऱ्या पावसाळी आधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरण्याबाबत आणि या सर्व प्रश्नाना मार्गी लावण्याबाबत मच्छीमार तसेच शेतकरी वर्गाला आश्वासित केले. या दौऱ्याचे आयोजन उरण नगपालिकेच्या नगराध्यक्षा भावना ताई घाणेकर यांनी यांनी केले.या वेळी सिताराम नाखवा, मार्तंड नाखवा, के एल कोळी, रमेश भगत, भारत नाखवा, रमेश नाखवा, जयेंद्र नाखवा नरेश कोळी, उरण नगरपालिकेचे राट्रवादी पक्षाचे सर्व नगरसेवक , सामाजिक कार्यकर्ते सचिन रमेश डाऊर, कल्पेश थळी, मधुकर थळी, कॉंग्रेस नेते भालचंद्र घरत. मनोहर थळी, शैलेश डाऊर, देवदास थळी, मुकेश थळी , परेश म्हात्रे आणि मोठ्या संखेने करंजा ग्रामस्थ उपस्थित होते.