सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • केरळमध्ये मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात पुढील 48 तासांत पावसाची शक्यता, विदर्भाला 15 जूनपर्यंत प्रतीक्षा
 क्राईम

राजस्थानात लपून बसलेला सचिन घायवळ अखेर जेरबंद; बदललेल्या रूपामुळे ओळखणंही झालं कठीण

डिजिटल पुणे    05-06-2026 16:07:08

पुणे : पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला राजस्थानमधून अटक केली आहे. तब्बल नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या सचिनला गुन्हे शाखेच्या पथकाने सिकर जिल्ह्यातील दिंगपूर गावातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आले आहे.

सचिन घायवळ याच्याविरोधात खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न, धमकी देणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारजे पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या एका खंडणी प्रकरणात त्याच्यावर सुमारे 44 लाख रुपयांहून अधिक रक्कम उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. त्यानंतर तो फरार झाला होता.

फरारी काळात सचिनने आपली ओळख लपवण्यासाठी वेषांतर केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. दाढी आणि केस वाढवून त्याने आपला संपूर्ण चेहरामोहरा बदलला होता. अटकेनंतर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये त्याला ओळखणेही अवघड होत असल्याचे दिसून आले.

सचिनच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी पुणे जिल्हा, अहिल्यानगर तसेच मराठवाड्यात विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. अखेर तो राजस्थानात बनावट ओळखीने राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

दरम्यान, न्यायालयाने सचिन घायवळ याला 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, त्याच्याकडून आणखी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गुन्हेगारी कारवायांशी संबंधित इतर धागेदोरेही या चौकशीतून समोर येण्याची अपेक्षा आहे.


 Give Feedback



 जाहिराती