सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : BCCI चे तीन तगडे निर्णय, थेट कॅप्टन बदलला, सूर्यकुमार यादव टी-20 संघातून बाहेर, वैभव सूर्यवंशीची निवड
  • अभिजीत दीपके भारतात दाखल; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाने संभाजीनगरमधील निवासस्थान तात्पुरते सोडले
  • कॉकरोच जनता पार्टीच्या जंतरमंतर आंदोलनाला पोलिसांची परवानगी; अभिजीत दिपके भारतात दाखल होताच मोठे यश
 शहर

मोहनगडावर मेघडंबरीसह शिवस्मारकाचे लोकार्पण; सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या चार वर्षांच्या प्रयत्नांना यश

डिजीटल पुणे    06-06-2026 16:26:56

भोर : भोर तालुक्यातील ऐतिहासिक हिरडस मावळातील शिरगाव (ता. भोर) येथील दुर्ग मोहनगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीसह भव्य शिवस्मारकाचे उत्साहात लोकार्पण करण्यात आले. शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, पुणे शहर विभागाच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या अथक प्रयत्नांमुळे हे स्मारक उभारण्यात आले आहे. दुर्गम भागात असलेल्या मोहनगडावर स्मारकासाठी लागणारे साहित्य पोहोचविण्यापासून ते उभारणीपर्यंतचे सर्व काम स्वयंसेवकांनी श्रमदानातून पूर्ण केले.

या निमित्ताने दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी रात्री गडपायथ्याशी जननी मातेची पूजा व जागरण गोंधळ झाला. त्यानंतर गडावर प्रस्थान करून रविवारी पहाटे माहिती फलकाचे अनावरण, भगवा ध्वज भूमिपूजन, शिवस्मारक पूजन व भंडारा उधळून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

समुद्रसपाटीपासून सुमारे ३,६६० फूट उंचीवर असलेल्या मोहनगडावर पोहोचण्यासाठी शिरगाव येथील जननी मातेच्या मंदिरापासून सुमारे दोन तासांचा पायी प्रवास करावा लागतो. अशा दुर्गम ठिकाणी उभारलेले शिवस्मारक भविष्यात शिवभक्त, पर्यटक आणि इतिहासप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

कार्यक्रमाला रायगड स्मारक मंडळाचे सहकार्य लाभले असून प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्याने उभारलेल्या या स्मारकामुळे मोहनगडाच्या ऐतिहासिक वारशाला नवे अधिष्ठान मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


 Give Feedback



 जाहिराती