सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : BCCI चे तीन तगडे निर्णय, थेट कॅप्टन बदलला, सूर्यकुमार यादव टी-20 संघातून बाहेर, वैभव सूर्यवंशीची निवड
  • अभिजीत दीपके भारतात दाखल; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाने संभाजीनगरमधील निवासस्थान तात्पुरते सोडले
  • कॉकरोच जनता पार्टीच्या जंतरमंतर आंदोलनाला पोलिसांची परवानगी; अभिजीत दिपके भारतात दाखल होताच मोठे यश
 क्राईम

खाकीचा रुबाब महागात! पोलिसांची बनावट वर्दी घालून क्लिनिकमध्ये पोहोचलेल्या तरुणीला अटक

डिजीटल पुणे    08-06-2026 12:49:42

पुणे : पुण्यात पोलिसांच्या वर्दीचा गैरवापर करून स्वतःला अधिकारी म्हणून सादर करणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणीचा लष्कर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कॅम्प परिसरातील एका क्लिनिकमध्ये लवकर अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी तिने पोलीस उपनिरीक्षकाची वर्दी परिधान केल्याचे तपासात समोर आले आहे.

अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव समिना आसिफ इनामदार उर्फ समिना अयुब पठाण असे असून ती एका खासगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शनिवारी (6 जून) कॅम्प परिसरात गस्त घालत असताना लष्कर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे यांच्या पथकाला संबंधित तरुणी संशयास्पदरीत्या पोलिसांच्या गणवेशात दिसली.

तिच्याकडे ओळखपत्र आणि नियुक्तीबाबत विचारणा करण्यात आली असता ती समाधानकारक उत्तरे देऊ शकली नाही. त्यामुळे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ती प्रत्यक्षात पोलीस दलात कार्यरत नसल्याचे उघड झाले.

प्राथमिक तपासानुसार, क्लिनिकमध्ये डॉक्टरांची भेट लवकर मिळावी आणि कर्मचारी तसेच नागरिकांवर प्रभाव पाडता यावा, यासाठी तिने पोलीस वर्दीचा वापर केला होता. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिला अटक केली असून, यापूर्वीही तिने अशाच प्रकारे कोणाची दिशाभूल केली आहे का याचा तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती