सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : BCCI चे तीन तगडे निर्णय, थेट कॅप्टन बदलला, सूर्यकुमार यादव टी-20 संघातून बाहेर, वैभव सूर्यवंशीची निवड
  • अभिजीत दीपके भारतात दाखल; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाने संभाजीनगरमधील निवासस्थान तात्पुरते सोडले
  • कॉकरोच जनता पार्टीच्या जंतरमंतर आंदोलनाला पोलिसांची परवानगी; अभिजीत दिपके भारतात दाखल होताच मोठे यश
 शहर

पुण्यात सायबर फसवणुकीचे सत्र सुरूच; शेअर ट्रेडिंग, टास्क आणि बँक KYCच्या आमिषाने लाखोंचा गंडा

डिजीटल पुणे    08-06-2026 15:01:31

पुणे : पुणे शहरात सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची विविध प्रकारे आर्थिक फसवणूक केल्याच्या पाच स्वतंत्र घटना समोर आल्या आहेत. शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष, टेलिग्राम टास्क, बनावट गुंतवणूक योजना तसेच बँक KYC आणि क्रेडिट कार्ड अपडेटच्या नावाखाली नागरिकांना जाळ्यात ओढून लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

वानवडी, पर्वती, मांजरी आणि मुंढवा पोलीस ठाण्यांत याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका प्रकरणात शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ६.५९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत टास्क पूर्ण केल्यास कमिशन मिळेल असे सांगून ९.३० लाख रुपये उकळण्यात आले. तसेच बँक KYC आणि क्रेडिट कार्ड अपडेटच्या बहाण्याने नागरिकांच्या खात्यातून हजारो रुपयांची रक्कम परस्पर काढून घेण्यात आल्याचे तक्रारींमध्ये नमूद आहे.

पुणे पोलिसांनी नागरिकांना अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचे, सोशल मीडियावरील गुंतवणूक योजनांपासून सावध राहण्याचे आणि बँक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती कोणालाही न देण्याचे आवाहन केले आहे. सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.


 Give Feedback



 जाहिराती