सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : BCCI चे तीन तगडे निर्णय, थेट कॅप्टन बदलला, सूर्यकुमार यादव टी-20 संघातून बाहेर, वैभव सूर्यवंशीची निवड
  • अभिजीत दीपके भारतात दाखल; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाने संभाजीनगरमधील निवासस्थान तात्पुरते सोडले
  • कॉकरोच जनता पार्टीच्या जंतरमंतर आंदोलनाला पोलिसांची परवानगी; अभिजीत दिपके भारतात दाखल होताच मोठे यश
 शहर

सरकारी रुग्णालयात सुनेत्रा पवारांची अचानक पाहणी; अस्वच्छता पाहून कर्मचाऱ्यांना फटकारलं

डिजीटल पुणे    08-06-2026 17:04:01

पुणे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला अचानक भेट देत आरोग्य सेवांचा आढावा घेतला. कोणतीही पूर्वसूचना न देता केलेल्या या पाहणीत त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची तपासणी करत स्वच्छता, औषधांचा पुरवठा, रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा आणि प्रशासनाच्या कामकाजाची माहिती घेतली.

पाहणीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. काही ठिकाणी अस्वच्छता आणि हलगर्जीपणा आढळून आल्याने त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले. रुग्णालय परिसरातील स्वच्छता आणि शिस्त याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी त्यांनी डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही जबाबदारीने काम करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.सुनेत्रा पवार यांच्या या अचानक भेटीमुळे रुग्णालय प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. प्रत्यक्ष पाहणी करून त्रुटींवर बोट ठेवण्याची त्यांची कार्यपद्धती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.


 Give Feedback



 जाहिराती