पुणे : देशभरात सध्या कॉकरोच जनता पार्टीची चर्चा सुरू आहे. नीट पेपर फुटीचा मुद्दा कॉकरोच जनता पार्टीने उचलू धरला आहे. याच मुद्द्यावरून सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी भारतात आल्यानंतर 6 जून रोजी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल. आता कॉकरोच जनता पार्टीकडून पुण्यातही आंदोलन केले जात आहे. यासंबंधी माहिती आज अभिजित दीपके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. या घोषणेमुळे आता केंद्र सरकारवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात आंदोलन छेडणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी आता आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा इशारा दिला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरली.
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास देशव्यापी आंदोलन उभारण्यात येईल, अशी भूमिका दीपके यांनी स्पष्ट केली. या आंदोलनाची सुरुवात पुण्यातून होणार असून त्यानंतर लखनऊ, बेंगळुरू आदी शहरांमध्येही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला जाणार आहे. तसेच, २० जून रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे पुन्हा मोठे आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली.
यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबीयांच्या भावना आणि आईची काळजी याबाबतही मनोगत व्यक्त केले. "मी दोन वर्षांपूर्वी अमेरिकेला गेलो, तेव्हा माझी आई जितकी भावूक झाली नव्हती, त्यापेक्षा अधिक ती माझ्या भारतात परत येण्याच्या निर्णयामुळे रडली. तिला माझ्या अटकेची किंवा माझ्यावर हल्ला होण्याची भीती वाटत होती. मात्र, अन्यायाविरोधात कुणीतरी बोलणे गरजेचे आहे, हे मी तिला सांगितले," असे दीपके म्हणाले.
देशभरातील पालकांना आवाहन करताना त्यांनी म्हटले की, "तुमची मुलं सरकारला प्रश्न विचारत असतील, सामाजिक विषयांवर भूमिका घेत असतील, तर त्यांना रोखू नका. एकट्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होऊ शकतो; मात्र लाखो विद्यार्थी एकत्र आले, तर तो आवाज दाबणे कुणालाही शक्य होणार नाही."
"विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली, तर मी तुरुंगात जाण्यासही तयार आहे. मात्र, विद्यार्थ्यांवर अशी वेळ येऊ देणार नाही," असेही त्यांनी ठामपणे सांगितले.दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आंदोलनासाठी परवानगी मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच, "मी आता कायमस्वरूपी भारतात परतलो आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी इथूनच लढा सुरू ठेवणार आहे," असे सांगत त्यांनी पुढील आंदोलनाबाबतचा निर्धार व्यक्त केला.
उद्याच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करताना दीपके म्हणाले, "हजारो विद्यार्थी सहभागी होतील. जंतरमंतरवरील आंदोलनापेक्षाही मोठे आंदोलन पुण्यात होऊ शकते."तर आता अमेरिकेतून आलेला आहात, परत जाणार आहे का नाही? यावर उत्तर देताना म्हणाले, आता इथच, बॅक फॉर गुड. उद्या किती सपोर्ट एक्सपेक्टेड आहे? यावरती उत्तर देताना म्हणाले की, उद्या हजारो मध्ये विद्यार्थी जमा होईल, मला तर वाटत जतंर मंतर पेक्षा मोठं आंदोलन होऊ शकतं,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.