सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NDA II परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी UPSC चे सर्व्हर डाऊन, हेल्पलाईन डेस्कही बंद; विद्यार्थ्यांची तक्रार, मुदतवाढीची मागणी
  • धक्कादायक! तळेगाव MIDC मध्ये गॅस गळतीमुळं दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर, कामगारांमध्ये भीतीचं वातावरण
  • काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
  • महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
 जिल्हा

चाळीसगाव येथील सोलर प्रकल्पातील अनियमिततेची चौकशी करावी – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

डिजिटल पुणे    11-06-2026 14:26:25

मुंबई : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात उभारण्यात आलेल्या सोलर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करावी, तसेच प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींचे झोनिंग करून सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.मंत्रालयात महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार मंगेश चव्हाण व जळगावचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, सोलर प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींचे सर्वेक्षण करून कोणत्या झोनमध्ये किती जमीन येते, याची माहिती संकलित करावी. तसेच भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना रेडी रेकनरनुसार मोबदला मिळाला आहे का, याची पडताळणी करून याचाही अहवाल शासनाकडे सादर करावा. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मोबदल्याबाबत तीन स्वयंसेवी संस्थांमार्फत (एनजीओ) स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. या संस्था जळगाव जिल्ह्याबाहेरील असाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोलर प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या जमीन खरेदी व्यवहारांचीही चौकशी करण्याचे निर्देश देत महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, ज्या पात्र शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही, त्यांना तातडीने प्रलंबित रक्कम मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. यासाठी संबंधित सोलर ऊर्जा कंपनीच्या प्रतिनिधींची जिल्हास्तरावर बैठक घेण्यात यावी.  याबरोबरच प्रकल्प क्षेत्रातील इको-सेन्सिटिव्ह झोन, अभयारण्य क्षेत्र तसेच अन्य संबंधित जमिनींबाबत अचूक माहिती संकलित करून त्याचा सविस्तर अहवाल १५ दिवसांत शासनाकडे सादर करावा, असे निर्देशही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले.


 Give Feedback



 जाहिराती