सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • भारतीय हवाई दलाच्या विमान अपघातात 5 जणांचा मृ्त्यू; एअरक्राफ्टचे दोन तुकडे, आसाममधील घटनेनं देश हळहळला, चौकशीचे आदेश
  • पुणे वेधशाळेचा इशारा : 'एल निनो'चा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात कमी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला
  • मोठी बातमी! 22 ते 24 जूनदरम्यान पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे दर्शन बंद; मंदिर प्रशासनाची महत्त्वाची सूचना
  • दुष्काळाचं संकट गडद? 'एल निनो' सक्रिय; महाराष्ट्रासह देशात कमी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांची चिंता वाढली
  • : यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी नाही; शालेय शिक्षण विभागाकडून पहिली ते आठवीसाठी वेळापत्रक जाहीर
 DIGITAL PUNE NEWS

'देऊळ बंद 2'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; रितेश देशमुखच्या 'वेड'ला टाकलं मागे, 62 कोटींचा टप्पा पार

डिजिटल पुणे    11-06-2026 14:36:26

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीसाठी 2026 हे वर्ष विशेष ठरत असून, अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. त्यात आता 'देऊळ बंद 2' या चित्रपटानेही आपली वेगळी छाप उमटवली आहे. सामाजिक आशय, रहस्य आणि थरार यांचा मिलाफ असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सातत्याने चांगली कमाई करत आहे. सुमारे 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने अवघ्या 20 दिवसांत 62 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन, तर 73.16 कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन नोंदवले आहे. त्यामुळे हा चित्रपट आता 75 कोटी रुपयांच्या टप्प्याकडे वेगाने वाटचाल करत आहे.

20व्या दिवशीही कमाई कायम

चित्रपटाने प्रदर्शनाच्या 20व्या दिवशी 1.1 कोटी रुपयांची कमाई केली. 19व्या दिवसाच्या तुलनेत कमाईत किंचित घट झाली असली, तरी प्रेक्षकांचा ओघ कायम असल्याचे चित्र दिसून आले आहे.

आठवड्यानुसार कमाईचा आलेख

पहिला आठवडा – 30.2 कोटी रुपये

दुसरा आठवडा – 22.4 कोटी रुपये

16वा दिवस – 1.4 कोटी रुपये

17वा दिवस – 2.6 कोटी रुपये

18वा दिवस – 3.15 कोटी रुपये

19वा दिवस – 1.15 कोटी रुपये

20वा दिवस – 1.1 कोटी रुपये

चित्रपटातील कलाकारांचा प्रभावी अभिनय, दिग्दर्शनातील बारकावे आणि सामाजिक विषयाची प्रभावी मांडणी यामुळे प्रेक्षकांसह समीक्षकांनीही चित्रपटाचे कौतुक केले आहे.

मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत चौथ्या स्थानावर

'देऊळ बंद 2'ने 62 कोटी रुपयांची कमाई करत रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटाला मागे टाकले आहे. त्यामुळे सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत त्याने चौथे स्थान पटकावले आहे.

सर्वाधिक कमाई करणारे मराठी चित्रपट :

राजा शिवाजी – 105.64 कोटी रुपये

सैराट – 90 कोटी रुपये

बाईपण भारी देवा – 76.28 कोटी रुपये

देऊळ बंद 2 – 62 कोटी रुपये

वेड – 61.2 कोटी रुपये

नटसम्राट – 42 कोटी रुपये

पावनखिंड – 37.72 कोटी रुपये

लय भारी – 37 कोटी रुपये

कट्यार काळजात घुसली – 35 कोटी रुपये

ठाकरे – 31.6 कोटी रुपये

मोहन जोशी आणि स्नेहल तरडे यांच्यासह कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे 'देऊळ बंद 2' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, 2026 मधील सर्वाधिक यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये त्याची गणना केली जात आहे


 Give Feedback



 जाहिराती