सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NDA II परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी UPSC चे सर्व्हर डाऊन, हेल्पलाईन डेस्कही बंद; विद्यार्थ्यांची तक्रार, मुदतवाढीची मागणी
  • धक्कादायक! तळेगाव MIDC मध्ये गॅस गळतीमुळं दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर, कामगारांमध्ये भीतीचं वातावरण
  • काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
  • महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
 शहर

पळवून नेलेले बाळ तातडीने आईकडे सुपूर्द करण्यात मिळाले होते यश ;पतित पावन संघटनेतर्फे बंडगार्डन पोलीस स्टेशन पोलिसांचा सत्कार!

डिजीटल पुणे    12-06-2026 10:54:54

 पुणे : आईपासून पळवून नेलेले एक वर्षाचे तान्हे बाळ तातडीने तपास करून १६ तासात परत मिळवून देण्याच्या कामगिरीबद्दल पतित पावन संघटनेतर्फे बंडगार्डन पोलीस स्टेशन पोलिसांचा  सत्कार  करण्यात आला.बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरक्षक संतोष पांढरे  यांचा सत्कार  पतित पावन संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील,प्रांत सहसंघटक रवींद्र भांडवलकर,जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे,सौरभ पवार, मुकुंद चव्हाण,पुणे शहर पालक गिरीश काकडे, बाळा कांबळे,यादव पुजारी, मिलिंद तिकोने,गणेश बिबवे,सचिन येनगूल,विनायक रणदिवे,यश चव्हाण,अक्षय तुपे,योगेश वाडेकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन शहर कार्याध्यक्ष संतोष गुरु,नरसिंग कोळी यांनी केले.११ जून २०२६ रोजी हा सन्मान कार्यक्रम झाला.    

 पुणे स्टेशन परिसरातून ३० मे २०२६ रोजी रात्री  एक वर्ष वयाच्या  तान्ह्या बाळाला तिच्या आई पासून चोरून पळवण्यात आले असता ,बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  संतोष   पांढरे  यांच्या नेतृत्वात अवघ्या १६ तासाच्या आत गुन्ह्याचा तपास करून त्या बाळाची आणि तिच्या आईची पुन्हा भेट घडवून आणण्यात पोलीस खात यशस्वी ठरले.या तपासात ७० सीसीटीव्ही तपासून पुणे पोलीस आयुक्त अगदी शेवटपर्यंत मागोवा घेत होते.पोलिसांनी चांगली तपास  कामगिरी करत माणुसकीचा झरा जिवंत ठेवला .या प्रकरणातील ३ आरोपीना दौंड येथे ३१ मे २०२६ रोजी अटक करण्यात आली.सौ.शिवानी अमोल भोसले या महिलेला तिचे बाळ परत सुपूर्द करण्यात पोलिसांना यश आले.    


 Give Feedback



 जाहिराती