सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दुष्काळाचं संकट गडद? 'एल निनो' सक्रिय; महाराष्ट्रासह देशात कमी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांची चिंता वाढली
  • : यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी नाही; शालेय शिक्षण विभागाकडून पहिली ते आठवीसाठी वेळापत्रक जाहीर
 शहर

सौंदर्यशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय सिडेस्को परीक्षेचे पदवीदान उत्साहात ;इम्प्रेशन इंटरनॅशनल ॲकॅडमीतर्फे आयोजन

डिजिटल पुणे    13-06-2026 11:18:39

पुणे इम्प्रेशन इंटरनॅशनल ॲकॅडमीतर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सौंदर्यशास्त्राच्या  सिडेस्को परीक्षेच्या पदवीप्रदान समारंभाचे आयोजन पुण्यातील पी वाय सी हॉल येथे करण्यात आले होते. या सिडेस्को परीक्षेचा पदवीदान समारंभात सिडेस्को  मीडिया मेक अप  व सिडेस्को ब्युटी थेरपी या अभ्यासक्रमाच्या १५  विद्यार्थिनींना इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमीच्या संचालिका कल्याणी उमराणी, पुष्पा भगत यांच्या हस्ते  पदवी प्रदान करण्यात आली.१० जून रोजी हा कार्यक्रम झाला.
 
यावेळी वीस वर्षापेक्षा जास्त अनुभव व यशस्वी झालेल्या इम्प्रेशन इंटरनॅशनल ॲकॅडमी मधून सिडेस्को परीक्षेची पदवी घेतलेल्या माजी विद्यार्थिनींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सिडेस्को ही एक सौंदर्यशास्त्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाची  प्रतिष्ठित परीक्षा असून ब्युटी थेरपी व मेकअप क्षेत्रात चांगल्या करिअरच्या संधी  यामध्ये उपलब्ध आहेत.
 
 इंप्रेशन इंटरनॅशनल अकॅडमी तर्फे या  सिडेस्को परीक्षेच्या तयारीसाठी  तज्ञ शिक्षकांकडून ट्रेनिंग दिले जाते. इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमी ची सुरुवात  १९८७  साली पुष्पा भगत यांनी केली. त्यानंतर कल्याणी उमराणी यांनी १९९५ साली याची धुरा सांभाळली. इम्प्रेशन  इंटरनॅशनल ॲकॅडमी ही सिडेस्को परीक्षेसाठी अधिकृत मान्यता प्राप्त संस्था आहे.  भरपूर प्रॅक्टिस व तज्ञ होईपर्यंत वैयक्तिक मार्गदर्शन हे इंप्रेशन इंटरनॅशनल अकॅडमी, फर्ग्युसन कॉलेज रोड शिवाजीनगर पुणेची खासियत आहे.सध्या इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमीच्या विद्यार्थिनी नामांकित कंपन्या व ब्युटी क्षेत्रात कार्यरत आहेत,अशी माहिती यावेळी देण्यात आली. 


 Give Feedback



 जाहिराती