सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात शिकलेले धीरज सेठ नवे लष्करप्रमुख; संरक्षण मंत्रालयाकडून आदेश जारी, देशसेवेत मोठी जबाबदारी
  • भारतीय हवाई दलाच्या विमान अपघातात 5 जणांचा मृ्त्यू; एअरक्राफ्टचे दोन तुकडे, आसाममधील घटनेनं देश हळहळला, चौकशीचे आदेश
  • पुणे वेधशाळेचा इशारा : 'एल निनो'चा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात कमी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला
  • मोठी बातमी! 22 ते 24 जूनदरम्यान पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे दर्शन बंद; मंदिर प्रशासनाची महत्त्वाची सूचना
  • दुष्काळाचं संकट गडद? 'एल निनो' सक्रिय; महाराष्ट्रासह देशात कमी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांची चिंता वाढली
  • : यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी नाही; शालेय शिक्षण विभागाकडून पहिली ते आठवीसाठी वेळापत्रक जाहीर
 जिल्हा

मोठी बातमी! 22 ते 24 जूनदरम्यान पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे दर्शन बंद; मंदिर प्रशासनाची महत्त्वाची सूचना

डिजीटल पुणे    13-06-2026 15:00:38

पंढरपूर : विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाण्याचे नियोजन करणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. 22 ते 24 जून 2026 या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे या तीन दिवसांत पंढरपूरला येण्याचे नियोजन टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या संवर्धनासाठी विशेष लेपन प्रक्रिया करण्यात येणार आहे. विठ्ठल मूर्तीवरील नैसर्गिक झीज लक्षात घेऊन भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, राज्य पुरातत्त्व विभाग आणि संवर्धन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पार पडणार आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समिती, वारकरी प्रतिनिधी आणि पुरातत्त्व विभागाची बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये पारंपरिक की रासायनिक पद्धतीने लेपन करायचे, यावर चर्चा झाल्यानंतर अखेर रासायनिक पद्धतीने संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

माहितीनुसार, विठ्ठल मूर्तीच्या पायाजवळ झीज झाल्याचे तसेच काही भागांमध्ये सूक्ष्म छिद्रे निर्माण झाल्याचे आढळून आले आहे. मूर्तीचे आयुष्यमान वाढविण्यासाठी आणि झिजलेल्या भागांचे संरक्षण करण्यासाठी मूळ दगडाशी सुसंगत साहित्य आणि विशेष सेंद्रिय रसायनांचा वापर करून लेपन केले जाणार आहे.

22 ते 24 जून या कालावधीत सुरू असलेल्या या तांत्रिक प्रक्रियेमुळे मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे देशभरातील वारकरी, भाविक आणि पर्यटकांनी या कालावधीत पंढरपूरला येणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.यापूर्वी 1988, 2005, 2012 आणि 2020 या वर्षांमध्येही विठ्ठल मूर्तीचे संवर्धन करण्यात आले होते. मागील संवर्धनानंतर सुमारे पाच वर्षांचा कालावधी उलटल्याने पुन्हा एकदा ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

 22 ते 24 जूनदरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचे संवर्धन

 या तीन दिवसांत मंदिर दर्शनासाठी बंद राहणार

 भारतीय व राज्य पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली प्रक्रिया

 मूर्तीवरील झीज आणि सूक्ष्म छिद्रांची दुरुस्ती केली जाणार

 भाविकांनी 22, 23 आणि 24 जून रोजी पंढरपूरला येणे टाळावे, प्रशासनाचे आवाहन.


 Give Feedback



 जाहिराती