सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : तुकाराम मुंढेंची बदली करू नका, त्यांनी चांगला दणका दिलाय; जरांगे पाटील म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय
  • अमेरिका-इराण युद्ध थांबताच चित्र फिरलं, सोने-चांदी दरात मोठी वाढ
  • मेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराच्या बातमीचा परिणाम आशियाई बाजारांमध्ये दिसून आला आहे. जपान आणि दक्षिण कोरियातील शेअर बाजारांमध्ये तेजी सुरु आहे.
  • महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा वाढली; १८ जूननंतर मुसळधार पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम
 जिल्हा

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत;विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

डिजीटल पुणे    15-06-2026 18:07:19

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत होणार आहे. विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.विधानभवन येथे आयोजित बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार सुधीर मुनगंटीवार,दीपक केसरकर, नाना पटोले, जयंत पाटील, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, अनिल परब, प्रसाद लाड, हेमंत पाटील, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.बैठकीत पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे नियोजन आणि कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


 Give Feedback



 जाहिराती