सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : तुकाराम मुंढेंची बदली करू नका, त्यांनी चांगला दणका दिलाय; जरांगे पाटील म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय
  • अमेरिका-इराण युद्ध थांबताच चित्र फिरलं, सोने-चांदी दरात मोठी वाढ
  • मेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराच्या बातमीचा परिणाम आशियाई बाजारांमध्ये दिसून आला आहे. जपान आणि दक्षिण कोरियातील शेअर बाजारांमध्ये तेजी सुरु आहे.
  • महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा वाढली; १८ जूननंतर मुसळधार पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम
 DIGITAL PUNE NEWS

पुण्याच्या मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती विद्यार्थी दत्तक योजनेतून १५९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य

डिजीटल पुणे    15-06-2026 18:19:48

पुणे  : पुण्याच्या मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि श्री कसबा गणपती सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गेली २३ वर्षे राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी दत्तक योजने अंतर्गत यावर्षी १५९ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शुल्क व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

हॉटेल सेंट्रल पार्क, शिवाजीनगर येथे झालेल्या या कार्यक्रमास कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. हेमंत रासने, मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्री. श्रीकांत शेटे तसेच शिक्षण समुपदेशक सौ. चैत्राली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या योजनेचा लाभ रमणबाग, हुजूरपागा, अहिल्यादेवी, नंदादीप, कर्वे संस्था, विमलाबाई गरवारे तसेच पुण्यातील इतर अनेक नामांकित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळाला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व पालकांना शिक्षणाचे महत्त्व, परिश्रम आणि सातत्य याविषयी मार्गदर्शन केले.शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शाळांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

गेल्या २३ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमातून आतापर्यंत ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक सहाय्य मिळाले आहे. मागील वर्षी १२५ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता, तर यावर्षी १५९ विद्यार्थ्यांना शालेय शुल्क व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि विविध सहकाऱ्यांच्या योगदानामुळे हा उपक्रम सातत्याने यशस्वीपणे राबविला जात असून, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भक्कम आधार ठरत आहे.


 Give Feedback



 जाहिराती