सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आई, साईबाबा तर कोणी मुलाची शपथ घेतली; तुम्हाला सोडणार नाही, खासदारांनी उद्धव ठाकरेंना शब्द दिल्याचा संजय राऊतांचा दावा
  • NEET परीक्षेच्या काही दिवसआधी सरकारचा मोठा निर्णय! थेट टेलिग्रामवरच बंदी
 विश्लेषण

लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पुणे सज्ज; पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिक बसमधून पालखी मार्गाची पाहणी

डिजीटल पुणे    16-06-2026 12:45:00

पुणे : आळंदी ते पंढरपूर पायी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकरी बांधवांच्या स्वागतासाठी पुणे शहर प्रशासन सज्ज झाले आहे. कळस, धानोरी, संगमवाडी, भवानी पेठ आणि हडपसर परिसरातील पालखी मार्गाची व्यापक पाहणी करण्यात आली. ही पाहणी पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिक बसमधून करण्यात आली.

पालखी सोहळ्यादरम्यान लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी विविध नागरी सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच आवश्यक दुरुस्तीच्या कामांचा आढावा घेण्यात आला. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करून यंदाचा पालखी सोहळा अधिक सुव्यवस्थित, सुरक्षित आणि यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आयुक्त नवल किशोर राम, आमदार हेमंत रासने, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, शहर अभियंता पावसकर, उपमहापौर परशुराम वाडेकर, पक्षनेते सोपान चव्हाण, उपायुक्त माधव जगताप, सहकारी नगरसेवक, नगरसेविका तसेच नागरिक उपस्थित होते.वारकरी सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाकडून पालखी मार्गावरील सर्व तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

 


 Give Feedback



 जाहिराती