पुणे : पुणे शहरातील विविध विकासकामांचा वेग, नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा तसेच आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीत शहरातील सुरू असलेल्या विकास प्रकल्पांची प्रगती, पायाभूत सुविधांची उभारणी, नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित प्रश्न तसेच पावसाळ्यादरम्यान उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणींवर चर्चा करण्यात आली. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
बैठकीला आमदार नीलम गोरे, हेमंत रासने, भीमराव तापकीर, चेतन तुपे, बापूसाहेब पठारे यांच्यासह उपमहापौर परशुराम वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त मुख्य सचिव (नवी-२), आयुक्त आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याबरोबरच पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधांसाठी प्रशासन सज्ज असल्याचे या बैठकीतून स्पष्ट करण्यात आले.