सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरु होणार, लढाई आता लोकसभा, कोर्टात अन् रस्त्यावर चालेल; फुटीर खासदारांना संजय राऊतांचा गर्भित इशारा
  • युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; 1 हजारहून अधिक ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागली; तेल डेपो उद्ध्वस्त
  • निम्मा जून संपला तरी मान्सूनची प्रतीक्षा; 24 जूननंतर कोकण-मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
  • मोठी बातमी: अखेर ओमराजेंसह 6 खासदार फुटले, ऑपरेशन टायगर यशस्वी, ठाकरेंचा व्हिप डावलला, 3 खासदारच उपस्थित!
 DIGITAL PUNE NEWS

'देऊळ बंद 2'ची पुण्यात जबरदस्त क्रेझ! आमदार बापूसाहेब पठारे यांनी 1500 तिकिटे खरेदी करत थिएटरच केले हाऊसफुल

डिजीटल पुणे    18-06-2026 17:47:46

पुणे : दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या बहुचर्चित 'देऊळ बंद 2' या चित्रपटाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून, पुण्यात या चित्रपटासाठी एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे आणि त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांसाठी तब्बल 1500 तिकिटांची खरेदी करत संपूर्ण थिएटरच आरक्षित केले.

विशेष म्हणजे, नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या शोला आमदार बापूसाहेब पठारे स्वतः उपस्थित राहिले आणि मतदारसंघातील नागरिकांसोबत चित्रपटाचा आनंद घेतला. या उपक्रमाबद्दल प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत पठारे यांचे आभार मानले.

व्हिडीओमध्ये बोलताना प्रवीण तरडे म्हणाले की, “प्रभागातील नागरिकांसाठी 'देऊळ बंद 2'च्या 1500 तिकिटांची खरेदी करणारे हे पहिले आमदार आहेत. समाजाला सकारात्मक संदेश देणारा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांच्या विचारांमध्ये बदल होईल, असा विश्वास आहे.”

दरम्यान, 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या 'देऊळ बंद 2' चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. चित्रपटात मोहन जोशी यांनी श्री स्वामी समर्थ यांची भूमिका साकारली असून, स्नेहल तरडे, रमेश परदेशी, सविता मालपेकर आणि मंगेश देसाई यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.पुण्यातील या विशेष शोमुळे 'देऊळ बंद 2'च्या लोकप्रियतेत आणखी भर पडली असून, चित्रपटाची चर्चा सर्वत्र रंगली आहे.


 Give Feedback



 जाहिराती