सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा 20 वर्षांनंतर निकाल; पुराव्याअभावी पद्मसिंह पाटीलसह सर्व आरोपी निर्दोष
  • : मोठी बातमी : ओमराजे केस हरताच एकनाथ शिंदेंनी चक्रं फिरवली, अमित शाहांसोबत चर्चा, आता वरिष्ठ न्यायालयात जाणार!
  • आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, महसूल विभागाकडून 1 रुपया नाममात्र दराने मिळणार पडीक जमिनी
 जिल्हा

आंबेनळी घाट अपघातातील मृत व्यक्तींच्या कुटुंबातील वारसांना शासकीय नोकरी शासनाने द्यावी सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे,अनिल माळवी यांची मागणी*

डिजीटल पुणे    20-06-2026 11:35:29

सातारा : अत्यंत दुःखद आणि मन सुन्न करणारी बातमी 24 मे रोजी महाबळेश्वर येथील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात आसगाव गावातील सातारा जिल्ह्य येथील आठ तरुण मुलांचा अकाली व दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी ऐकून संपूर्ण गाव, नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजमन हादरून गेले आहे.

आज आसगावने फक्त आठ व्यक्ती गमावलेल्या नाहीत, तर आठ कुटुंबांचे आधार, आठ घरांची स्वप्ने, आठ आई-वडिलांच्या आशा, भावंडांचे प्रेम आणि मित्रांच्या आठवणी गमावल्या आहेत. ज्या घरांमध्ये कालपर्यंत हसू, गप्पा, स्वप्ने आणि भविष्याचे नियोजन होते, त्या घरांमध्ये आज निःशब्द वेदना आणि अश्रू आहेत.

महेश अनिल पवार, रितेश राजेंद्र लोखंडे, अनिल अभिमन्यू शिंगटे, उत्कर्ष आनंद शिंगटे, आदित्य अशोक साळुंखे, सुहास जितेंद्र लोखंडे, अंश समीर चव्हाण आणि नितीन किसन नायकोंडे या आपल्या लेकरांनी इतक्या लहान वयात जगाचा निरोप घ्यावा लागणे ही अत्यंत वेदनादायक आणि असह्य बाब आहे.देवाने ही परीक्षा त्यांच्या कुटुंबांना का दिली याचे उत्तर कदाचित कुणाकडेही नसेल; पण आज  आपण यांच्या कुटुंबियांसोबत खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे.

आज त्यांची कुटुंब सावरून समाजात उभे राहणे गरजेचे आहे या प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला किंवा त्यांच्या वारसाला शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था ,अशा ठिकाणी शासनाने नोकरी देऊन त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे प्रत्येकाची परिस्थिती नाजूक आहे  राज्य शासनाने या कुटुंबाचा आधारवड होणे गरजेचे आहे जेणेकरून हे कुटुंब काही प्रमाणात का होईना सावरले जातील 

अशा मागणीचे पत्र जिल्हाधिकारी व माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे  करणार असल्याचे  सामाजिक कार्यकर्ते अनिल माळवी सर ,तानाजी कांबळे यांनी म्हटले आहे भीमशक्ती मंडळाचे जितेंद्र कांबळे यांचे माहितीसाठी सहकार्य लाभले


 Give Feedback



 जाहिराती