सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा 20 वर्षांनंतर निकाल; पुराव्याअभावी पद्मसिंह पाटीलसह सर्व आरोपी निर्दोष
  • : मोठी बातमी : ओमराजे केस हरताच एकनाथ शिंदेंनी चक्रं फिरवली, अमित शाहांसोबत चर्चा, आता वरिष्ठ न्यायालयात जाणार!
  • आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, महसूल विभागाकडून 1 रुपया नाममात्र दराने मिळणार पडीक जमिनी
 जिल्हा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन ; गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात सहभागी होणार

डिजीटल पुणे    20-06-2026 13:06:30

कोल्हापूर : श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरातील विकास कामाचा शुभारंभ सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर सकाळी दहा वाजता आगमन झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या शुभारंभ सोहळ्याला व सभांना ते उपस्थित राहणार आहेत.शुक्रवारी रात्री उशिरा भारताचे गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांचे आगमन झाले. ते कोल्हापूर इचलकरंजीच्या एकदिवशीय दौऱ्यावर आले आहेत. रात्री त्यांचा मुक्काम शासकीय विश्राम गृहावर होता.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आज २० जूनला शनिवारी सकाळी ११ वाजता श्री. महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रिमंडळातील अन्य सदस्य यासाठी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पोलीस परेड ग्राउंड वर होणारी जाहीर सभा तसेच इचलकरंजी येथील सहकारी बँकेच्या सोहळ्यात व शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी सहाच्या सुमारास ते पुन्हा मुंबईकडे प्रयाण करतील. राज्याच्या सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार हे देखील या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसोबत कोल्हापूर येथे आले आहेत.

विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले,आमदार अभिमन्यू पवार,आमदार अशोकराव माने, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार राहुल आवाडे, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा,जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड,जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, विजय जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती