सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे आमदार अपात्र, त्या आधारे निवडणूक आयोग अन् राहुल नार्वेकरांचे निर्णय चुकीचे; ठाकरेंच्या वकिलांचा सडेतोड युक्तिवाद, शिवसेना कुणाची याचा निकाल लवकरच
  • काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
  • मोठी राजकीय घडामोड! रुपाली चाकणकरांनंतर अखेर नवे नेतृत्व; वैशाली नागवडे यांच्याकडे NCP महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा
 जिल्हा

देवगड येथे नवीन मत्स्य महाविद्यालय सुरु करण्याबाबत प्रस्ताव सादर करा – मंत्री दत्तात्रय भरणे

डिजिटल पुणे    05-08-2026 16:07:12

मुंबई : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे नवीन मत्स्य महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करून तो मंत्रीमंडळ बैठकीत सादर करण्यात यावा, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील रामेश्वर येथे आंबा संशोधन उपकेंद्र व देवगड येथे मत्स्य महाविद्यालय स्थापन करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, कृषी विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

मंत्रालयात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत मत्स्य महाविद्यालय स्थापनेच्या प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मत्स्य व्यवसाय शिक्षणाचा विस्तार, उपलब्ध जागेचा वापर, आवश्यक पदनिर्मिती, नवीन इमारतीसाठी जमीन उपलब्ध करून देणे तसेच आवश्यक निधीची तरतूद या बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी कृषिमंत्री भरणे यांनी रामेश्वर येथे आंबा संशोधन उपकेंद्रांतर्गत कीटकनाशक अवशेष तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा प्रस्तावही  कृषी विद्यापीठाने विभागाकडे सादर करावा, असे निर्देश दिले. या प्रयोगशाळेमुळे कोकणातील आंबा व अन्य फळपिकांच्या गुणवत्तेचे वैज्ञानिक परीक्षण स्थानिक स्तरावर होणार असून, निर्यातक्षम उत्पादनांना चालना मिळेल. शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अवशेष तपासणीची सुविधा उपलब्ध होऊन कोकणातील आंब्याच्या निर्यातीला मोठी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


 Give Feedback



 जाहिराती