दिल्ली : दिल्लीतील जैतपूर येथील हरी नगरमध्ये मोठी दुघर्टना घडली आहे.समाधी स्थळावरील सुमारे 100 फुट लांबीची भिंत अचानक कोसळून तिच्या खाली असलेल्या झोपड्यांचा चेंदामेंदा झाला. त्यामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन पुरुष, दोन महिला आणि दोन लहान मुलींचा समावेश आहे. या ठिकाणी अद्याप बचावकार्य सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिंत कोसळल्याने जवळील अनेक झोपड्या मलब्याखाली दबल्या गेल्या. घटनास्थळी दिल्ली पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ व स्थानिक प्रशासनाची पथके तातडीने दाखल झाली.अपघाताचा आवाज इतका मोठा होता की जवळच्या घरांमधील लोक घाबरले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली आहे.
घटनास्थळी दिल्ली पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ व स्थानिक प्रशासनाची पथके तातडीने दाखल झाली. बचाव मोहिमेतून आठ जणांना बाहेर काढण्यात आले. त्यांना एम्स ट्रॉमा सेंटर आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आठ जणांचा मृत्यू झाला.
अग्निशमन दल आणि पोलिस पथके घटनास्थळी परिस्थिती हाताळत आहेत. पुढील धोका टाळण्यासाठी आजूबाजूचा परिसर रिकामा केला जात आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा दिल्लीतील जुन्या इमारतींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.दिल्लीतील जैतपूर भागात घडलेली ही दुर्घटना परिसरातील दुर्लक्षित पायाभूत सुविधा व सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न निर्माण करते.