उरण : रायगड, नवी मुंबई मधिल कामगारांसाठी स्वर्गीय दी.बा. पाटील साहेबांनंतर कामगारनेते महेंद्रशेठ घरत हे कामगारांच्या न्यायी हक्कासाठी लढणारे एकमेव नेते आहेत. म्हणूनच महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेकडे कामकारांचा कल वाढताना दिसत आहे.जे.एन.पि.टी.मधिल मे. स्पीडी मल्टीमोड्स सि. एफ. एस. हे मागील ३५ वर्षापूर्वी स्थानिकांच्या जमिनी संपादित करून सुरु करण्यात आले आहे. या सि. एफ. एस. मधे सर्व कामगार हे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मुले आहेत.व्यवस्थापनाने फोडा आणि राज्यकरा या कुटनीतीचा अवलंब करून कामगारांमध्ये फूट पाडून एका युनियनच्या तब्बल सात युनियन करण्यास कामगारांना भाग पाडले व त्यांना मानसिक त्रास देऊ लागले. परंतु व्यवस्थापनाकडून कामगारांवर होणाऱ्या जाचाला कंटाळून सर्व कामगारांनी एकत्र येऊन राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्वीकारले. न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण शुक्रवार दिनांक ८ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या नामफलक अनावरण प्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष -पि. के. रमण, सरचिटणीस -वैभव पाटील, उपाध्यक्ष -किरीट पाटील, विनोद म्हात्रे, संजय ठाकुर,मुरलीधर ठाकूर, सचिव -लंकेश ठाकूर, आनंद ठाकूर, आदिनाथ भोईर, संघटक -आदित्य घरत, विवेक म्हात्रे, किरण कुंभार, अरुण म्हात्रे, राजेंद्र भगत, चंद्रकांत ठाकूर, उमेश भोईर, जितेंद्र घरत,अरुण पाटील, सुजित पाटील, हितेन घरत,अलंकार पाटील, प्रशांत पाटील, संतोष म्हात्रे, शमीम अन्सारी, सुभाष यादव, महिला संघटक -कल्पना ठाकूर, रेखा घरत, निर्मला पाटील, विनया पाटील,तसेच स्पीडी कंपनीचे कामगार प्रतिनिधी - तुकाराम कडू, भानुदास तांडेल, दिनेश कडू व शेकडोच्या संख्येने कामगार उपस्थित होते.दिवसेंदिवस कामगारांचा ओढा सदर संघटनेकडे वाढत असल्याचे दिसून येते.