सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • लोढा-बिढांनी मध्ये येऊ नये, कबुतरखान्यावरुन राज ठाकरेंची रोखठोक भूमिका, जैन मुनींनाही सुनावलं!
  • गणपतीपुळे महाद्वाराजवळ मंदिर प्रशासनाकडून वेशभूषेसंदर्भात व नव्या ड्रेसकोड प्रणालीसंदर्भात बोर्ड लावण्यात आला आहे. त्यामुळे, आता भाविकांना पूर्ण पोशाख परिधान करुनच मंदिरात यावे लागेल.
  • ‘खालिद का शिवाजी’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका; मराठा बांधव आणि छावा संघटनेचे पदाधिकारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
  • कबुतरखाना येथे मराठी एकीकरण समितीच्या वतीने आज आंदोलन; परिसराला छावणीचे स्वरुप
 शहर

पुण्यात कुंडेश्वर दर्शनाला जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात;25 ते 30 महिला भाविक जखमी,काहींची प्रकृती चिंताजनक

डिजिटल पुणे    11-08-2025 15:39:16

पुणे : श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारनिमित्ताने शिव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यात भीमाशंकर हे मोठे ज्योतिर्लिंग असल्याने येथेही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करत आहेत. त्यासोबतच, अनेक शिव मंदिराकडे वाहनांच्या व भाविकांच्या रांगा दिसून येतात. दरम्यान, भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कुंडेश्वर दर्शनाला जाताना भीषण अपघात झाला असून या दुर्दैवी घटनेत 25 ते 30 महिला भाविक जखमी झाल्या आहेत. साधारणत: दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारासचा हा अपघात घडल्याची माहिती आहे.ही घटना खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कुंडेश्वर शिव मंदिराकडे जाताना घाट परिसरात घडली.

श्रावण महिन्याच्या तिसऱ्याया सोमवार निमित्ताने दर्शनासाठी भाविकांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना घडली. खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे दर्शनाला जात असताना, नागमोडी वळणावर घाट चढताना गाडी रिटर्न आल्याने महिला भाविकांची पिकअप जीप पलटली, विशेष म्हणजे या पिकअपने 5 ते 6 पलटी खाल्ल्यानं त्यातील 25 ते 30 महिला भाविक गंभीर जखमी झाल्या आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती असून जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी प्रयत्न केल्याचं दिसून आलं.अधिक माहितीसाठी खेड पोलीस स्टेशनकडून तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती