सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • रक्षाबंधनाला भाऊ रिकाम्या हाती आला तर जीवे मारु, नवऱ्याच्या धमकीनंतर स्नेहाने आयुष्य संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
  • मुंबईत धक्कादायक घटना, अल्पवयीन मुलींवर पाच जणांकडून सामूहिक अत्याचार, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
  • महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका; राज्य सरकार, नांदणी मठ आणि वनताराची संयुक्त दाखल करणार
  • राज्यात मराठा-ओबीसी दंगली घडल्यास देवेंद्र फडणवीसच जबाबदार; मनोज जरांगेंनी सांगितला मुंबईचा प्लॅन
 जिल्हा

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू; विविध संघटनांकडून जोरदार पाठिंबा

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    11-08-2025 17:55:33

उरण : उरणमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून (११ ऑगस्ट) आमरण उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण सकाळी ८:३० वाजल्यापासून आर.के.एफ. जे.एन.पी. विद्यालय, शेवा, उरण येथील गेटसमोर सुरू आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दर्शवत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला.

यावेळी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपोषणाची सुरुवात करण्यात आली. तसेच, १९८४ च्या शेतकरी आंदोलनातील पंच हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून, दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. माजी विश्वस्त भूषण पाटील यांच्या हस्ते उपोषणाचा शुभारंभ करण्यात आला.

प्रमुख मागण्या:

कर्मचाऱ्यांनी खालील प्रमुख मागण्या शासनासमोर मांडल्या आहेत:

 * जुलाई २०१७ पासूनची वार्षिक वेतनवाढ आणि महागाई भत्त्याची थकबाकी तात्काळ कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी.

 * जुन्या भविष्य निर्वाह निधी योजनेचा लाभ पुन्हा सुरू करावा.

 * गेली १० ते १२ वर्षे तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करून शासकीय नियमानुसार वेतन व नेमणूक पत्र द्यावे.

 * सन २००३-०४ पासून मराठी माध्यमातून अनुदान न घेता दहावीच्या वर्गांना शासनाकडून १००% अनुदान स्वीकारावे.

 * जेएनपीटी प्रशासनाकडून दिली जाणारी PAP फी सवलतीची ३ लाख रुपयांची मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत वाढवावी.

 * सर्व पात्र कर्मचाऱ्यांना १२ वर्षांची वरिष्ठ श्रेणी व २४ वर्षांची निवड श्रेणीचा लाभ तात्काळ मंजूर करावा.

 * सातव्या वेतन आयोगातून ३१ महिन्यांची थकबाकी आणि सहाव्या वेतन आयोगाची ५१ महिन्यांची थकबाकी तात्काळ जमा करावी.

 * पन्नास टक्के महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट करून बावीस महिन्यांची थकबाकी तात्काळ जमा करावी.

 * पाचव्या वेतन आयोगातील ६३ महिन्यांची थकबाकी जमा करावी.

विविध मान्यवरांनी दिला जाहीर पाठिंबा: 

उपोषणाच्या पहिल्याच दिवशी विविध संघटनांचे पदाधिकारी, कामगार नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषणाला पाठिंबा देण्याची ग्वाही सर्वांनी दिली.

यावेळी माजी विश्वस्त भूषण पाटील, जे एन पी टी विश्वस्त रवी पाटील साहेब, कामगार नेते संतोष पवार, पालक संघर्ष समितीचे अध्यक्ष किरण घरत, उपाध्यक्ष योगेश तांडेल, सचिव अविनाश म्हात्रे, उपाध्यक्ष रमाकांत म्हात्रे, सहसचिव विश्वास पाटील, कामगार नेते रवींद्र घरत (जासई), पंचायत समितीचे किरण विठ्ठल घरत, टीडीएफचे कार्याध्यक्ष नरसू पाटील, पीटीए सदस्य विकास कडू, काँग्रेस महिला अध्यक्ष (उरण) रेखा घरत, प्राध्यापक एल. बी. पाटील, सरपंच अनिता अरविंद घरत (करळ सावरखार), उपसरपंच जितेंद्र घरत (करळ सावरखार), उपसरपंच हेमलता भालचंद्र ठाकूर (जसखार), माजी सरपंच नितीन पाटील (जसखार), पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर (उरण), माजी सरपंच निशांत विष्णू घरत (नवीन शेवा), योगेश भगत (भेंडखळ),

प्राध्यापक राजेंद्र मढवी,श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे (उरण), कामगार नेते सुरेश पाटील, भाजप उरण चिटणीस बळीराम घरत (जासई), सामाजिक कार्यकर्ते शिरीष म्हात्रे (जासई), उपाध्यक्ष अमर म्हात्रे (पालक संघर्ष समिती) आणि सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे (बेलपाडा) सविता नितीन मढवी सरपंच (नवघर) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी शाळेचे सर्व पालक, पालक संघर्ष समिती, माजी विद्यार्थी संघटना यांच्या प्रतिनिधींनीही उपस्थिती दर्शवून या उपोषणाला शेवटपर्यंत पाठिंबा देणार असल्याची ग्वाही दिली.


 Give Feedback



 जाहिराती