सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गणपतीपुळे महाद्वाराजवळ मंदिर प्रशासनाकडून वेशभूषेसंदर्भात व नव्या ड्रेसकोड प्रणालीसंदर्भात बोर्ड लावण्यात आला आहे. त्यामुळे, आता भाविकांना पूर्ण पोशाख परिधान करुनच मंदिरात यावे लागेल.
  • बीएमटीसी बस सेवा देणाऱ्या कामगारांना 40 वर्षानंतर न्याय मिळणार; सिडकोच्या माध्यमातून आर्थिक मोबदला दिला जाणार
  • लातूर जिल्ह्यातील लामजण्यात श्रावण सोमवारी गोवंश हत्या; अटकेतील तिघांना तीन दिवसाची पोलिस कोठडी
  • ‘खालिद का शिवाजी’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका; मराठा बांधव आणि छावा संघटनेचे पदाधिकारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
  • पगार थकले म्हणून ट्रॉमा केअर रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप; रुग्णसेवेत अडथळा
  • कबुतरखाना येथे मराठी एकीकरण समितीच्या वतीने आज आंदोलन; परिसराला छावणीचे स्वरुप
 जिल्हा

नागपूर विभागातील १,५८२ रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १३.८१ कोटींची मदत

डिजिटल पुणे    13-08-2025 12:07:32

मुंबई : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मोठा आधार बनला आहे. नागपूर विभागात मागील सात महिन्यांत तब्बल १५८२ रुग्णांना १३ कोटी ८१ लाख २० हजार रुपयांची वैद्यकीय मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली, जिल्हा कक्षांची स्थापना करण्यात आली असल्याने रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही. रुग्णांनी प्रथम महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतील, तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न असणाऱ्या रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा वापर होतो आणि निधी खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचतो.

संपूर्ण राज्यात पेपरलेस प्रणाली, जिल्हा कक्षांची स्थापना आणि विविध सकारात्मक बदलांमुळे गरजू रुग्णांपर्यंत वेळेत मदत पोहोचत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार कक्षाचे कामकाज पारदर्शक पद्धतीने राबवले जात असून निधी खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचत आहे. यापुढेही जास्तीतजास्त गरजू रुग्णांना मदत केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी कळविले आहे.

 

नागपूर विभागातील मदतीचा आढावा (१ जानेवारी ते ३१ जुलै २०२५)

जिल्हा   रुग्णसंख्या   मदत रक्कम

नागपूर  1396         12,16,82,000

वर्धा        41           39,55,000

भंडारा     31           29,35,000

गोंदिया    50           39,00,000

चंद्रपूर      54          47,48,000

गडचिरोली  9          9,00,000

२० गंभीर आजारांसाठी मदत:

कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्षे २ ते ६)

हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण

कर्करोग (शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन)

रस्ते अपघात

बालकांच्या शस्त्रक्रिया

हिप व गुडघा रिप्लेसमेंट

मेंदूचे आजार, डायालिसिस, अस्थिबंधन

बर्न/विद्युत अपघातग्रस्त रुग्ण

नवजात शिशुंचे आजार इ.

आवश्यक कागदपत्रे:

 

रुग्णाचे आधार कार्ड व रेशन कार्ड

रुग्ण दाखल असल्यास जिओ टॅग फोटो (अनिवार्य)

तहसील उत्पन्नाचा दाखला (1.60 लाखांपेक्षा कमी)

वैद्यकीय रिपोर्ट व खर्चाचे प्रमाणपत्र

एफआयआर (अपघातग्रस्तांसाठी)

झेडटीसीसी पावती (अवयव प्रत्यारोपणासाठी)

सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात [email protected] या ईमेलवर पाठवा

अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक: 9321 103 103


 Give Feedback



 जाहिराती