सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गणपतीपुळे महाद्वाराजवळ मंदिर प्रशासनाकडून वेशभूषेसंदर्भात व नव्या ड्रेसकोड प्रणालीसंदर्भात बोर्ड लावण्यात आला आहे. त्यामुळे, आता भाविकांना पूर्ण पोशाख परिधान करुनच मंदिरात यावे लागेल.
  • बीएमटीसी बस सेवा देणाऱ्या कामगारांना 40 वर्षानंतर न्याय मिळणार; सिडकोच्या माध्यमातून आर्थिक मोबदला दिला जाणार
  • लातूर जिल्ह्यातील लामजण्यात श्रावण सोमवारी गोवंश हत्या; अटकेतील तिघांना तीन दिवसाची पोलिस कोठडी
  • ‘खालिद का शिवाजी’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका; मराठा बांधव आणि छावा संघटनेचे पदाधिकारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
  • पगार थकले म्हणून ट्रॉमा केअर रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप; रुग्णसेवेत अडथळा
  • कबुतरखाना येथे मराठी एकीकरण समितीच्या वतीने आज आंदोलन; परिसराला छावणीचे स्वरुप
 शहर

घोलप महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस उत्साहात साजरा

डिजिटल पुणे    13-08-2025 14:16:31

पुणे : भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस.आर.रंगनाथन यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा होणारा राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता जगताप यांच्या हस्ते डॉ. एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.


प्रास्ताविक करत असताना ग्रंथपाल डॉ. विठ्ठल नाईकवाडी यांनी ग्रंथालय विषयामध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या पंचसूत्री वर भाष्य करत डॉ. एस.आर.रंगनाथन यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली.
आपल्या मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. संगीता जगताप यांनी राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाची संकल्पना स्पष्ट करत या दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन विद्यार्थी व ग्रंथालयांचे घट्ट नाते निर्माण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.


सदर कार्यक्रम प्रसंगी डॉ. दिनकर चव्हाण, डॉ. सतीश एकार, डॉ. विशाल पावसे, डॉ. विजय घाडगे, डॉ. नागेश भंडारी, डॉ. क्रांती बोरावके, डॉ. सुनिल वाघ, प्रा. संतोष सास्तुरकर, प्रणित पावले, ग्रंथालय कर्मचारी योगेश मदने, किरण कळमकर, गणपत किंडरे  तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती