सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गणपतीपुळे महाद्वाराजवळ मंदिर प्रशासनाकडून वेशभूषेसंदर्भात व नव्या ड्रेसकोड प्रणालीसंदर्भात बोर्ड लावण्यात आला आहे. त्यामुळे, आता भाविकांना पूर्ण पोशाख परिधान करुनच मंदिरात यावे लागेल.
  • बीएमटीसी बस सेवा देणाऱ्या कामगारांना 40 वर्षानंतर न्याय मिळणार; सिडकोच्या माध्यमातून आर्थिक मोबदला दिला जाणार
  • लातूर जिल्ह्यातील लामजण्यात श्रावण सोमवारी गोवंश हत्या; अटकेतील तिघांना तीन दिवसाची पोलिस कोठडी
  • ‘खालिद का शिवाजी’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका; मराठा बांधव आणि छावा संघटनेचे पदाधिकारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
  • पगार थकले म्हणून ट्रॉमा केअर रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप; रुग्णसेवेत अडथळा
  • कबुतरखाना येथे मराठी एकीकरण समितीच्या वतीने आज आंदोलन; परिसराला छावणीचे स्वरुप
 जिल्हा

सफाई कामगारांच्या मुलांकरिता अंबरनाथ परिसरातील शाळेचे बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण करा

डिजिटल पुणे    13-08-2025 14:28:50

मुंबई : अनुसूचित जाती-जमातीमधील सफाई कामगारांच्या मुलांकरिता अंबरनाथ परिसरातील शाळेचे बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण करा. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भव्य कन्हवेन्शन सेंटर उभारण्याची कार्यवाही गतीने करावी, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.मंत्रालयात विविध विषयांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, आमदार डॉ.बालाजी किणीकर उपस्थित होते.

मंत्री शिरसाट म्हणाले की, अनुसूचित जाती-जमातीमधील सफाई कामगारांच्या मुलांकरिता अंबरनाथ परिसरातील शाळेचे बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण करावे. उल्हासनगर परिसरात १०० मुले व मुलींचे वसतीगृहाकरिता जागा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच उल्हासनगर येथे संविधान भवन उभारण्याबाबत संबधित समाजकल्याण आयुक्त यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.


 Give Feedback



 जाहिराती