सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गणपतीपुळे महाद्वाराजवळ मंदिर प्रशासनाकडून वेशभूषेसंदर्भात व नव्या ड्रेसकोड प्रणालीसंदर्भात बोर्ड लावण्यात आला आहे. त्यामुळे, आता भाविकांना पूर्ण पोशाख परिधान करुनच मंदिरात यावे लागेल.
  • बीएमटीसी बस सेवा देणाऱ्या कामगारांना 40 वर्षानंतर न्याय मिळणार; सिडकोच्या माध्यमातून आर्थिक मोबदला दिला जाणार
  • लातूर जिल्ह्यातील लामजण्यात श्रावण सोमवारी गोवंश हत्या; अटकेतील तिघांना तीन दिवसाची पोलिस कोठडी
  • ‘खालिद का शिवाजी’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका; मराठा बांधव आणि छावा संघटनेचे पदाधिकारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
  • पगार थकले म्हणून ट्रॉमा केअर रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप; रुग्णसेवेत अडथळा
  • कबुतरखाना येथे मराठी एकीकरण समितीच्या वतीने आज आंदोलन; परिसराला छावणीचे स्वरुप
 शहर

शंकरराव भेलके महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा (महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन)

अजिंक्य स्वामी    13-08-2025 15:41:49

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव भेलके महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस.आर.रंगनाथन यांना अभिवादन करण्यात आले. भोर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पुण्य नगरीचे पत्रकार जीवन सोनावणे, सकाळ वार्ताहर किरण बधे, पुढारी पत्रकार माणिक पवार, प्रभात पत्रकार विशाल शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांच्या शुभहस्ते संस्थेचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी घोलप यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. ग्रंथप्रदर्शनामध्ये सामाजिक, राजकीय, अवांतर वाचन, चरित्रे, कथा, कादंबऱ्या, स्पर्धा परीक्षा इ. पुस्तकांचा समावेश होता, विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कार्यालयातील कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने ग्रंथप्रदर्शनामध्ये भाग घेतला.

प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांनी  आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी वाचन करणे महत्वाचे आहे, वाचनामुळे आपले जीवन समृद्ध होऊन समाज विकसित होतो, असे प्रतिपादन केले, यावेळी भोर पत्रकार संघाच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वाचन संस्कृती अभियान सुरु करण्यात आले, यामध्ये विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचून त्याचे अवलोकन करून जो विद्यार्थी वाचक जास्तीत जास्त पुस्तके वाचेल त्यास तसेच या अभियानामध्ये जे सहभागी होतील त्यामधून प्रथम तीन क्रमांकाचे पारितोषिक आणि सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येतील, अशी माहिती सकाळचे पत्रकार किरण बधे तसेच पुढारीचे पत्रकार माणिक पवार यांनी दिली, आणि या अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी सहदेव रोडे, प्रा.पौर्णिमा कारळे, डॉ.सचिन घाडगे, प्रा.गणपत आवटे, प्रा.जीवन गायकवाड, प्रा.दयानंद जाधवर, प्रा.माउली कोंडे, प्रा.महेश कोळपे, प्रा.भूषण समगीर, प्रा.ऐश्वर्या धुमाळ, प्रा.अंकिता महांगरे, सुमित कांबळे, अभिषेक मोरे इ. उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल  प्रा.भगवान गावित यांनी केले. ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.भगवान गावित, सुमित कांबळे, अभिषेक मोरे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

 

 


 Give Feedback



 जाहिराती