सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गणपतीपुळे महाद्वाराजवळ मंदिर प्रशासनाकडून वेशभूषेसंदर्भात व नव्या ड्रेसकोड प्रणालीसंदर्भात बोर्ड लावण्यात आला आहे. त्यामुळे, आता भाविकांना पूर्ण पोशाख परिधान करुनच मंदिरात यावे लागेल.
  • बीएमटीसी बस सेवा देणाऱ्या कामगारांना 40 वर्षानंतर न्याय मिळणार; सिडकोच्या माध्यमातून आर्थिक मोबदला दिला जाणार
  • लातूर जिल्ह्यातील लामजण्यात श्रावण सोमवारी गोवंश हत्या; अटकेतील तिघांना तीन दिवसाची पोलिस कोठडी
  • ‘खालिद का शिवाजी’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका; मराठा बांधव आणि छावा संघटनेचे पदाधिकारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
  • पगार थकले म्हणून ट्रॉमा केअर रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप; रुग्णसेवेत अडथळा
  • कबुतरखाना येथे मराठी एकीकरण समितीच्या वतीने आज आंदोलन; परिसराला छावणीचे स्वरुप
 जिल्हा

दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा – मंत्री प्रताप सरनाईक

डिजिटल पुणे    13-08-2025 15:50:14

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवरील दहिसर टोल नाक्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपव्यय होतो. तसेच वाहनांच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते. त्यासाठी दहिसर टोल नाका पुढे २ किलोमीटर अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मंत्री सरनाईक म्हणाले, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील अनेक टोल नाके रद्द केले तसेच सर्व टोल नाक्यावरील लहान वाहनांना टोलमाफी केली. या निर्णयाचे सर्वसामान्य जनतेने स्वागत केले आहे. दहिसर टोल नाक्यामुळे मिरा भाईंदर शहरातील १५ लाख स्थानिक नागरिक, वाहनचालक, तसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाढत असून इंधनाचा विनाकारण अपव्यय होत आहे.

परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील हा टोल नाका शहराच्या आत असल्याने, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा टोल नाका २ किलोमीटर अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर हलवावा. यामुळे मीरा-भाईंदर व मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल.

या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला जाईल अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे ही मागणी मान्य झाल्यास, स्थानिक नागरिकांना टोलमुक्त प्रवासाचा लाभ मिळेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होईल, असा विश्वासही परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.


 Give Feedback



 जाहिराती