सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • लोढा-बिढांनी मध्ये येऊ नये, कबुतरखान्यावरुन राज ठाकरेंची रोखठोक भूमिका, जैन मुनींनाही सुनावलं!
  • गणपतीपुळे महाद्वाराजवळ मंदिर प्रशासनाकडून वेशभूषेसंदर्भात व नव्या ड्रेसकोड प्रणालीसंदर्भात बोर्ड लावण्यात आला आहे. त्यामुळे, आता भाविकांना पूर्ण पोशाख परिधान करुनच मंदिरात यावे लागेल.
  • ‘खालिद का शिवाजी’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका; मराठा बांधव आणि छावा संघटनेचे पदाधिकारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
  • कबुतरखाना येथे मराठी एकीकरण समितीच्या वतीने आज आंदोलन; परिसराला छावणीचे स्वरुप
 जिल्हा

कोकणातील जांभा चिरेखाण उद्योगवाढीसाठी गौण खनिज नियमांत शिथिलता आणावी महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश

डिजिटल पुणे    14-08-2025 15:44:48

मुंबई : कोकणातील उद्योजकांना न्याय मिळावा आणि स्थानिक रोजगाराच्या संधी वाढाव्यात, यासाठी गौण खनिज उत्खनन व वाहतूक संदर्भातील नियमांत शिथिलता आणण्याच्या दृष्टीने १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.मंत्रालयात जांभा चिरेखाण उद्योगातील अडचणींवर उपाययोजना करण्याबाबत आयोजित  बैठकीत राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात समान नियम लागू व्हावेत. बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या जांभा दगडाच्या स्वामित्वधनावरील दंडाची मुदत तसेच वाहतूक पासाची मुदत वाढवावी. गौण खनिज परवाना मंजूर करताना कालमर्यादा निश्चित करावी, जेणेकरून मुदत संपल्यानंतर वाहतुकीत अडथळा निर्माण होणार नाही.

तसेच मंजूर कालावधीत उत्खनन झालेला पण विक्री न झालेला साठा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले. या निर्णयामुळे कोकणातील जांभा चिरेखाण आणि इतर गौण खनिज व्यवसाय सुरळीत सुरू राहून स्थानिकांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे.बैठकीस जांभा चिराखाण मालक असोसिएशनचे अध्यक्ष  शशिकांत डोंगरे,  माधव ओक,  रुपेश पवार, दूरदृष्यप्राणालीद्वारे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती