पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीपजी कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करत राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव (प्रशासन) ए.एम.जाधव, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष अतुलजी शितोळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.आपल्या शुभेच्छापर संदेशात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीपजी कदम यांनी ७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत स्वातंत्र्य या शब्दाचा नेमका आशय उपस्थितांसमोर उलगडला.याप्रसंगी प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी सर्वांना ध्वज प्रतिज्ञा दिली तर माजी स्थायी समिती अध्यक्ष अतुलजी शितोळे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.ध्वजारोहण कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, समिती समन्वयक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.