पुणे : मंगळवार पेठ लगतची जागा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी आंबेडकरी चळवळीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ठिय्या आंदोलनात समविचारी संघटनासमवेत 'संविधान ग्रुप' चे संस्थापक राकेश सोनवणे,राष्ट्रीय अध्यक्ष सचिन गजरमल,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण सोनवणे,पुणे शहर अध्यक्ष सागर आडगळे,गणेश लांडगे,उपाध्यक्ष सरचिटणीस राजवर्धन कांबळे सहभागी झाले.
मंगळवार पेठ लगतची जागा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी ांबेडकरी चळवळीच्या वतीने हे तीव्र आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाच्या पार्श्भूमीवर आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या तर्फे सदर जागेचा खाजगी विकासकाशी मुदतीचा भाडे करार झाला होता. त्या विकसकाला पुढोल काम 'करण्याबाबतचे स्थगिती आदेश बजावण्यात आले. सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या जागेला स्थगिती आदेश बजावले .हे शासनाचे सकारात्मक पाऊल असून या निर्णयाबदल संविधान ग्रुप ने शासनाचे आभार व्यक्त केले.