सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कोकण नगरने 10 थर लावताच प्रताप सरनाईंकाचा जय जवानला टोमणा, म्हणाले,'काही गोविंदा पथकांना वाटतं आमचा विश्वविक्रम कोणीच मोडणार नाही'
  • HSRP : लाखो वाहनधारकांना मोठा दिलासा; एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता आणखी मुदतवाढ…
  • माझ्या नादाला लागू नका! लय चुरूचुरू बोलू नको, भावकीनं लक्ष दिलं म्हणून निवडून आलास, अजितदादांचा रोहितदादाला हसत हसत दम
  • मुंबईतील सर्वात मोठ्या दहीहंडी मनोऱ्यावर 'छावा', कवी कलश अन् संभाजीराजेंचं बलिदान; मुख्यमंत्रीही भावुक
  • गणपतीपुळे महाद्वाराजवळ मंदिर प्रशासनाकडून वेशभूषेसंदर्भात व नव्या ड्रेसकोड प्रणालीसंदर्भात बोर्ड लावण्यात आला आहे. त्यामुळे, आता भाविकांना पूर्ण पोशाख परिधान करुनच मंदिरात यावे लागेल.
 शहर

अनंतराव पवार महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

डिजिटल पुणे    16-08-2025 13:59:49

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करून राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रगीत व ध्वजगीताचे सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांसह सर्वांनी सामूहिकपणे गायन केले.मा. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांनी उपस्थितांना ध्वजप्रतिज्ञा दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालय विकास समितीचे विद्यार्थी प्रतिनिधी मा. श्री. सूरज पवळे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अनिल मरे उपस्थित होते. 


याप्रसंगी महाविद्यालयातील सेजल सांगळे, शितल उपरीकर, कुणाल इंगवले या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. आपल्या मनोगतातून त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीचा इतिहास, त्यासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांच्या कार्याचा आढावा घेऊन स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आज आपण ज्या आनंदाने आणि सुरक्षित जीवन जगत आहोत ते केवळ त्यांच्या बलिदानामुळेच हे अधोरेखित केले. मा. प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना शुभेच्छा देऊन आजच्या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी त्यांनी महाविद्यालयास १०० कॅडेट्सचे एनसीसी युनिट मिळाल्याची माहिती दिली. यातूनच आता महाविद्यालयात देशसेवेसाठी विद्यार्थी तयार होणार असल्याचे सांगताना मुळशी तालुक्यातील अनंतराव पवार महाविद्यालय हे एकमेव अनुदानित महाविद्यालय असून आता महाविद्यालयास एनसीसीचे युनिट मिळालेले एकमेव महाविद्यालय आहे. हे महाविद्यालयाया दृष्टीने भूषणावह आहे.याचा फायदा मुळशी तालुक्यातील विद्यार्थ्यांना होणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तो घ्यावा असेही त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. प्रमुख पाहुणे मा. श्री. सूरज पवळे यांनी उपस्थितांना शुभेच्छा देऊन स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना अभिवादन केले. 
 

यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी व उपस्थितांमध्ये देशभक्ती रुजविण्यासाठी सांस्कृतिक विभागाच्या वतीने देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्या कोकाटे, सेजल सांगळे, पूजा पाईकराव, सानिका म्हेत्रे, चैत्राली कोकरे, सोनाली बिराजदार आदी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत आणि कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली.संकेत ओव्हाळ व अक्षदा रोकडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण केले.


कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. अनिल मरे यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉ. विजय बालघरे व डॉ. श्रीकांत देशमुख यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रा. सिद्धार्थ नवतुरे यांनी विशेष प्रयत्न केले.याप्रंगी महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती