सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कोकण नगरने 10 थर लावताच प्रताप सरनाईंकाचा जय जवानला टोमणा, म्हणाले,'काही गोविंदा पथकांना वाटतं आमचा विश्वविक्रम कोणीच मोडणार नाही'
  • HSRP : लाखो वाहनधारकांना मोठा दिलासा; एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता आणखी मुदतवाढ…
  • माझ्या नादाला लागू नका! लय चुरूचुरू बोलू नको, भावकीनं लक्ष दिलं म्हणून निवडून आलास, अजितदादांचा रोहितदादाला हसत हसत दम
  • मुंबईतील सर्वात मोठ्या दहीहंडी मनोऱ्यावर 'छावा', कवी कलश अन् संभाजीराजेंचं बलिदान; मुख्यमंत्रीही भावुक
  • गणपतीपुळे महाद्वाराजवळ मंदिर प्रशासनाकडून वेशभूषेसंदर्भात व नव्या ड्रेसकोड प्रणालीसंदर्भात बोर्ड लावण्यात आला आहे. त्यामुळे, आता भाविकांना पूर्ण पोशाख परिधान करुनच मंदिरात यावे लागेल.
 जिल्हा

शासनाच्या योजनांचा लाभ तृतीयपंथीयांपर्यंत; पालकमंत्र्यांनी केले स्वतंत्र कक्षाचे उद्घाटन

डिजिटल पुणे    16-08-2025 17:13:24

नंदुरबार : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवनात तृतीयपंथी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे व समाज कल्याण निरीक्षक विवेकानंद चव्हाण उपस्थित होते.

तृतीयपंथी कक्षाच्या माध्यमातून तृतीयपंथीय बांधवांच्या तक्रारींचे निवारण, त्यांना शासनाच्या पात्र योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करणे हे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजना, आबा कार्ड, आरोग्य विमा योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण यांसह शिक्षण, आरोग्य, रोजगार, सामाजिक समावेश व हक्क संरक्षण यासाठी हा कक्ष कार्यरत राहणार आहे.

महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा दुसरा स्वतंत्र कक्ष असून, नंदुरबार जिल्ह्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या उपक्रमासाठी समाज कल्याण विभागाबरोबरच विघ्नहर्ता, नंदुरबार नवचैतन्य फाउंडेशन, नवनिर्माण, नंदुरबार व सीवायडीए, नंदुरबार या स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य केले.तृतीयपंथीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन व सामाजिक संस्था मिळून सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सहाय्यक आयुक्त श्री. वसावे यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती