सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 विश्लेषण

बाप्पाच्या आगमनाची पुण्यात जय्यत तयारी; पाचही मानाच्या गणपतींच्या दिमाखात निघणार मिरवणुका, असे आहे नियोजन

डिजिटल पुणे    06-09-2024 11:46:59

पुणे :  गणरायाच्या आगमनासाठी आता पुण्यनगरी सज्ज झाली आहे. उद्या गणेश चतुर्थी निमित्त घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणेश मंडळ लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी तयार आहेत. पुण्यातील गणेशोत्सवाचा  बाबतीत म्हणायचं तर मानाचे पाच गणपती आणि इतर प्रमुख गणेश मंडळांची गेल्या अनेक वर्षांपासून वैभवशाली परंपरा आहे. जगभरातील गणेशभक्तांचे आकर्षण असलेल्या आणि वैभवशाली परंपरा लाभलेल्या पुण्यनगरीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला उद्या, शनिवारी ७ सप्टेंबर रोजी उत्साहात प्रारंभ होत आहे. गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू असून, बाप्पाचा उत्सव दणक्यात साजरा करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या मानाचे पाच गणपती आणि प्रमुख मंडळांच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा दुपारपर्यंत होणार आहे. तत्पूर्वी, सर्वच मंडळांनी मिरवणुका काढण्याचे नियोजन केले असून, सनई-चौघड्यांचे मंगलस्वर, ढोल-ताशांचा गजर, तालांवर नाचणारे भगवे झेंडे, मर्दानी खेळांचे सादरीकरण अशा थाटात ‘श्रीं’चे स्वागत करण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत.

मानाचा पहिला गणपती: पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती

देखावा: श्री सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक

प्राणप्रतिष्ठा: ११ वाजून ३७ मिनीटे

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: प्रभात बँड, संघर्ष ढोल पथक, शौर्य ढोल ताशा पथक, श्रीराम पथक

मानाचा दुसरा गणपती: तांबडी जोगेश्वरी

देखावा: स्वानंद निवास

प्राणप्रतिष्ठा: दुपारी १२ वाजून ११ मिनीटे

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: न्यू गंधर्व ब्रास बँड, शिवमुद्रा ढोल ताशा पथक, ताल पथक, विष्णूनाद शंख पथक

मानाचा तिसरा गणपती: गुरुजी तालीम मंडळ

देखावा: गजमहाल

प्राणप्रतिष्ठा: दुपारी १ वाजून ३१ मिनीटे

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बँड, गुरुजी प्रतिष्ठान ढोल ताशा पथक, रुद्रांग ढोल ताशा पथक , आवर्तन ढोल ताशा पथक

मानाचा चौथा गणपती: तुळशीबाग गणपती उत्सव मंडळ

देखावा: ओडिशा येथील श्री जगन्नाथ मंदिर

प्राणप्रतिष्ठा: दुपारी १२.३० वाजता

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: लोणकर बंधूचा नगारा, शिवगर्जना ढोल पथक आणि विघ्नहर्ता ढोल ताशा पथक

मानाचा पाचवा गणपती: केसरीवाडा गणपती

देखावा: ऐतिहासिक केसरीवाड्यात बाप्पा विराजमान होणार

प्राणप्रतिष्ठा: सकाळी ११ वाजता

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: पालखी मधून श्रींची मिरवणूक काढली जाईल. यावेळी श्रीराम ढोल ताशा पथक आणि गंधाक्ष पथक यांचे वादन

 

पुण्यातील इतर प्रमुख गणेश मंडळ

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

प्राणप्रतिष्ठेची वेळ : दुपारी १२.३०.

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

देखावा: हिमाचल प्रदेश मधील जटोली शिवमंदिर

प्राणप्रतिष्ठा: ११ वाजून ११ मिनीटे

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: फुलांच्या सिंह रथातून मिरवणुकीला देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधूंची सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड आणि गंधाक्ष ढोल-ताशा

अखिल मंडई मंडळ

देखावा: पुरातन काळातील "शिवालय"

प्राणप्रतिष्ठा: दुपारी १२ वाजता

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: त्रिशूळ रथातून बाप्पाचे स्वागत. मिरवणुकीच्या अग्रभागी न्यू गंधर्व बॅन्ड पथक, स्वराज्य, सामर्थ्य ढोल पथक यांचे वादन

हुतात्मा बाबू गेनु मंडळ

देखावा: मदुराई येथील मीनाक्षी मंदिर

प्राणप्रतिष्ठा: दुपारी १२.३० वाजता

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: गजांत लक्ष्मी रथातून बाप्पाच्या स्वागतासाठी रूद्र गर्जना, नु. म. वी, मोरया व शिव प्रताप ढोल पथक सज्ज


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती