सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 विश्लेषण

सर्वप्रथम पुण्यात सुरु झाले गणेश उत्सव !! 'हे' आहेत पुण्यातील 5 मानाचे गणपती !!

डिजिटल पुणे    06-09-2024 12:16:35

पुणे : सध्या गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सर्वत्र पाहायला मिळत आहेत. उद्या 7 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पा प्रत्येक घराघरात विराजमान होणार आहेत. गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुर्थी हि म्हणले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे.

तर सर्वप्रथम महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाला पुण्यातून सुरवात केली होती. त्या  निमित्ताने आज आपण पुण्याच्या पाच मनाच्या गणपतीबद्दल त्यांच्या इतिहासाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

1. कसबा गणपती –

मानाच्या गणपतींमध्ये सर्वप्रथम कसबा गणपती हा पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखला जातो. या गणपतीची मूर्ती साडे तीन फूट उंचीची असते. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 1893 साली सुरुवात झाली. कसबा गणपतीचं मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून असल्याचं सांगितलं जातं. विसर्जन मिरवणुकीत कसबा गणपतीला पहिलं स्थान असतं.

2. तांबडी जोगेश्वरी –

पुण्यातील दुसरा मानाचा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी पितळी देव्हाऱ्यात या गणपतीची स्थापना केली जाते. कसबा गणपतीप्रमाणं या गणेशोत्सवालाही 1893 पासून प्रारंभ झाला. बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. मानाच्या गणपतींचं आणि इतर मोठ्या गणपतीचं दरवर्षी विसर्जन करण्याची रित नाही. मात्र, या गणपतीच्या मूर्तीचं दरवर्षी विसर्जन केलं जातं.

3.गुरुजी तालिम गणपती –

लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा तिसरा गणपती. या गणपतीची मूर्ती अतिशय आकर्षक आणि मोठ्या उंदरावर बसलेली असते. हा गणपती एका तालमीत बसवण्यात आला होता. आता ती तालीम अस्तित्वात नाही. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो. या गणेशोत्सवाला 1887 मध्ये सुरुवात झाली. भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला.

4. तुळशीबाग गणपती –

 पुण्यातला मानाचा चौथा गणपती आहे तुळशीबागेतला गणपती. तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. दक्षित तुळशीबागवाले यांनी 1900 साली या गणेशोत्सवाची उत्सव सुरुवात केली. हा गणपती उचंच उंच मूर्तीसाठी ओळखला जातो. तुळशीबाग गणपतीची मूर्ती फायबरची असते. ज्येष्ठ मूर्तीकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करतात. 

5. केसरी वाडा गणपती –

पुण्यातला शेवटचा आणि पाचवा मानाचा गणपती आहे केसरी गणपती. केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव 1894 पासून सुरु झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. पण 1905 पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने इथं होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. 1998 मध्ये इथली मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली. पुण्यातील मानाच्या पहिल्या चार गणपतीची विसर्जन मिरवणूक लक्ष्मी तर हे होते पुण्यातील 5 मानाचे गणपती. पुण्यातील या मानाच्या गणपतींना विशेष महत्व आहे. पुण्यातील गणेश उत्सव पाहण्यासाठी दूरवरून लोक पुण्यात गर्दी करतात. तुम्ही हि दरवर्षी पुण्यातील गणेश उत्सवाला भेट देत असला तर ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण ठरेल. 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती