सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • आपल्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
  • चंद्रकांत दादा यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद कार चालकाने दिली धडक.,चंद्रकांत दादा सुखरूप
  • आज सकाळी दगडूशेठ गणपतीची अजित पवार यांचे हस्ते पूजा
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
 विश्लेषण

महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर! नागपूरातील १८ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला जाणार

डिजिटल पुणे    19-09-2024 17:29:57

नागपूर  : राज्यातील उद्योग गेल्या काही काळात गुजरातला जात असल्याचा आरोप केला जात आहे. महाराष्ट्रातील उद्योग, वित्तीय संस्था केंद्र आणि महत्त्वाची कार्यालये गुजरातला पळवली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातोय. आता आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प  येणार होता. या प्रकल्पा अंतर्गत १८ हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वेदांत-फॉक्सकॉन, टाटा-एअरबस विमान प्रकल्प आणि आता सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये जाणार असल्याची माहिती आहे. निरर्थक उद्योग करणारे नेते महायुतीत असल्यानं असल्यानं उद्योग राज्याबाहेर जात असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय.

हिंदू - मुस्लिम, जीभ कापा- जीभेला चटके द्या, पक्ष फोडा- आमदार पळवा... सतत असे निरर्थक उद्योग करणारे महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे. अधिकारी मंत्र्यांना खुश करण्यात व्यस्त आहे. मंत्र्यांची मस्ती, आमदारांचे नको ते लाड यामुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे आणि राज्यातील तरुणांचे रोजगार हिरावले जात असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय.वडेट्टीवार यांच्या या आरोपावर सरकार कडून काय प्रत्युत्तर येत ते आता पाहावे लागेल.

दरम्यान, महायुती सरकार हे गुजरात धार्जिणे आहे असा आरोप विरोधक सातत्याने करत असतात आणि त्याला कारणही तस आहे. मागील २ वर्षात महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेले. त्यानंतर हिरे उद्योगही गुजरातला गेला. एवढच नव्हे तर बॉलीवूडमधला सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा फिल्मफेअर सोहळा गुजरातमध्ये पार पडला होता. त्यामुळे मोदी शाह हि जोडगोळी महाराष्ट्रावर अन्याय करत असल्याची भावना विरोधक व्यक्त करत असतात. आता आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने विरोधक आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकार साठी मात्र हा मोठा धक्का असेल.

याआधी जे प्रकल्प गुजरातला गेले ते महाविकास आघाडी सरकारच्या धोरणामुळे गेल्याची टीका शिंदे गटाकडून करण्यात येत होती. मात्र, आता महायुतीच्या काळातही मोठे प्रकल्प गुजरातला जात असल्याने महाविकास आघाडीच्या निशाण्यावर महायुती सरकार असणार आहे.नागपूरला येणारा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यात येण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकल्प गुजरातला जात असल्याने महाविकास आघाडी हा प्रचारात मोठा मुद्दा बनवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निवडणुकीच्या आधी महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती